‘आता वय झालं पूर्वीसारखं जमत नाही’, गोविंदाची बायको हे काय बोलून गेली
admin January 26, 2026 10:24 PM
[ad_1]

Sunita Ahuja : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. दोघांमधील नात्यातील तणाव, वाद आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे हे जोडपे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. अलीकडेच सुनीता आहूजाने दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदांच्या कथित अफेअर्सबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहूजा यांनी गोविंदांबाबत धक्कादायक दावा केला. त्यांनी सांगितले की, या वयातही गोविंदा तरुण अभिनेत्रींच्या प्रेमात पडतो. विशेष म्हणजे, तिने एका तरुण मराठी अभिनेत्रीशी गोविंदांचे अफेअर असल्याचा दावा केला, ज्यामुळे या वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे.

सुनीता म्हणाली की, आता त्याची मुले मोठी झाली असून अशा चर्चांमुळे त्याला मानसिक त्रास होतो. ‘या वयात आणि मुलांच्या वयाचा विचार करता अशा गोष्टी अजिबात शोभत नाहीत’ असे तिने स्पष्ट शब्दांत सांगितले.

आता हे वय नाही

सुनीता आहूजाने इंडस्ट्रीतील नव्या कलाकारांवरही गंभीर आरोप केले. तिच्या मते, आजकाल अनेक संघर्ष करणाऱ्या तरुण मुली मेहनतीपेक्षा अशा लोकांचा शोध घेतात, जे त्यांचा खर्च उचलू शकतील. अशा मुली अभिनेत्री होण्याच्या स्वप्नात लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि पुढे ब्लॅकमेलिंगपर्यंतही जातात असा दावा सुनीता यांनी केला. याच संदर्भात तिने गोविंदांना न्यूकमर मुलींचे शुगर डॅडी असे संबोधले. ज्यामुळे हा वाद अधिकच चिघळला.

सुनीता पुढे म्हणाली की, ‘अशा मुली खूप येतात, पण तुम्ही काही मूर्ख नाही. तुमचे वय 63 वर्षे आहे. तुमच्याकडे चांगले कुटुंब, सुंदर बायको आणि दोन मोठी मुले आहेत. आता या वयात हे सगळं शोभत नाही. तरुणपणी चुका होतात आम्हीही केल्या पण आता नाही’.

गोविंदांनी अखेर मौन सोडले

या संपूर्ण वादावर अभिनेता गोविंदाने अखेर प्रतिक्रिया दिली आहे. ANI शी बोलताना गोविंदाने सांगितले की, जेव्हा एखादी व्यक्ती गप्प राहते तेव्हा लोक तिला कमकुवत समजतात किंवा तिच्यावर लावलेले सर्व आरोप खरे मानतात. त्यामुळेच त्याने आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.

गोविंदा पुढे म्हणाला की, त्याला अशी माहिती मिळाली आहे की त्याच्या कुटुंबातील काही सदस्य नकळतपणे या संपूर्ण प्रकरणात ओढले जाऊ शकतात आणि सुरुवातीला त्यांना हे कळणारही नाही की ते एका मोठ्या कटाचा भाग बनत आहेत.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.