बिग बॉसच्या घरात होणार पहिली wild card एन्ट्री; दार उघडताच सगळेच शॉक; कोण येणार?
abp majha web team January 26, 2026 09:13 PM

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस'च्या घरात पाहिलं एलिमिनेशन पार पडलं. राधा पाटीलने बिग बॉसच्या घरातून एक्सिट घेतली. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात वादविवाद भांडणं आणि टास्क रंगताना दिसतायत. मात्र आता बिग बॉसच्या घरात एक नवी धमाकेदार एन्ट्री होणार आहे. आज रविवारच्या भागात बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरात नवा स्पर्धक येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता हा नवा स्पर्धक कोण असणार याची चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. 

बिग बॉसच्या घरात कोणाची एन्ट्री?

नुकतंच बिगबॉसच्या घरात राधा पाटीलचं एलिमिनेशन झालं . घरातील एक जागा रिकामी झाली असली तरी आता ही पोकळी भरून काढण्यासाठी नवा स्पर्धक सज्ज झालाय. बिग बॉसने घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचं सांगताच घरातील स्पर्धक शॉक झालेले दिसतात. 

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडत असतो. घरातील सगळ्या सदस्यांची धाकधूक वाढलेली आहे. काहींच्या चेहऱ्यावर नव्या सदस्याला पाहण्याची उत्सुकता तर काही जणांच्या चेहऱ्यावर टेन्शनही दिसतं. बिग बॉसच्या घराचं दार उघडतं आणि त्या स्पर्धकाला पाहून सगळेच शॉक होतात. काही स्पर्धकांना ही एन्ट्री प्रचंड आवडलेली दिसतेय. प्राजक्ता शुक्रेच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद झालेला दिसतोय. तर रूचिता जानदारची हवा चांगलीच टाईट झालेली दिसते. नेमकं घरात येणार कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वाईल्ड कार्ड एन्ट्री वरून अनेक अंदाज बांधले जात आहेत. काहींना अभिनेते जयवंत वाडकर येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्यांच्या मुलीने ते बिग बॉसच्या घरात जाणार नसल्याची पोस्ट करत विषयच संपवला. दुसरीकडे राखी सावंत हिच्या एन्ट्रीचीही चर्चा आहे. आता नेमकं कोण येणार बिग बॉसच्या घरात हे आजच्या भागात कळणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.