क्लार्कचं अफेअर पत्नीनं पकडलेलं, क्लार्कला घटस्फोटानंतर द्यावी लागलेली 300 कोटींची पोटगी
Marathi January 27, 2026 07:26 AM

मायकेल क्लार्क कायली बोल्ड घटस्फोट नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क त्याच्या क्रिकेटमधील करिअरसह विविध कारणांमुळं चर्चेत राहिला आहे. मायकल क्लार्कनं 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाची सुपर मॉडेल काइली बोन्डी हिच्यासोबत लग्न केलं होतं. तेव्हा त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. दोघेही नंतर मॉडेलिंग आणि क्रिकेट संदर्भातील कार्यक्रमांमध्ये दिसून यायचे. मात्र, मायकल क्लार्कनं निवृत्ती घेतल्यानंतर गोष्टी बदलल्या. क्लार्कचं त्याच्या असिस्टंट सोबत अफेअर असल्याचं समोर आलं आणि तेव्हापासून क्लार्क आणि काइली बोन्डी यांच्यातील नातं खराब झालं. क्लार्कचं त्याच्या असिस्टंट सोबत असणारं अफेअर 8 वर्षांचा संसार मोडण्यास कारणीभूत ठरलं. यानंतर मायकल क्लार्क आणि काइली बोन्डी यांचा घटस्फोट झाला.

Michael Clarke News :मायकल क्लार्कचं असिस्टंट सोबत अफेअर अन् संसार मोडला

मायकल क्लार्कची घटस्फोटित पत्नी काइली बोन्डी ऑस्ट्रेलियातील नामांकित सेलिब्रेटी आहे. काइली मॉडेलिंगसह टीव्ही कार्यक्रमात प्रेझेंटर म्हणून प्रसिद्ध आहे.  2019 मध्ये दोघांमध्ये वाद झाले होते. जेव्हा मायकल क्लार्क आणि त्याच्या असिस्टंटचं अफेअर समोर आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे काइली बोन्डी हिनं मायकल क्लार्क आणि त्याच्या असिस्टंटला एका हॉटेलमध्ये पकडलं होतं. या घटनेनंतर मायकल क्लार्कचं लग्न मोडलं होतं.

मायकल क्लार्क आणि काइली बोन्डी यांचा घटस्फोट 2020 मध्ये झाला. मात्र, हा घटस्फोट क्लार्कला महागात पडला. क्लार्कला पोटगी म्हणून 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 300 कोटी रुपये द्यावे लागले. क्रिकेट विश्वातील कोणत्याही खेळाडूचा हा सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो. या घटस्फोटानंतर क्लार्कच्या मुलीचा ताबा काइली बोन्डीला मिळाला. मात्र, मुलीसाठी मायकल क्लार्क आणि काइली बोन्डी भेटतात. सध्या दोघांमध्ये फक्त चांगली मैत्री आहे.

मायकल क्लार्कनं ऑस्ट्रेलियाला मिळवून दिलेला 2015 चा वर्ल्ड कप

ऑस्ट्रेलियासाठी मायकल क्लार्कनं कसोटी, वनडे आणि टी 20 क्रिकेट मिळून 394 सामने खेळले आहेत.  क्लार्कनं ऑस्ट्रेलियासाठी 115 कसोटी सामन्यात 8643 धावा केल्या. ज्यात 28 शतकं आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या 329 धावा आहे. क्लार्कनं 245 वनडे मॅचमध्ये 7981 धावा केल्या होत्या. यामध्ये त्यानं 8 शतकं आणि 58 अर्धशतकं केली आहेत.  मायकल क्लार्कनं 34 टी 20 सामन्यात एक अर्धशतकाच्या जोरावर 488 धावा केल्या आहेत. मायकल क्लार्कच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियानं 2015 चा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे.  मायकल क्लार्क आता स्वत:चं युट्यूब चॅनेल चालवतो.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.