सर्कल संस्था/हैदराबाद
हैदराबादच्या नामपल्ली भागात एका चारमजली फर्निचरच्या दुकानाला आग लागली आहे. या दुर्घटनेत महिलेसमवेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दुकानाला आग लागल्याच्या सुमारे 21 तासांनी बचाव अभियान संपुष्टात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. आगीच्या दुर्घटनेत एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे अभियान सातत्याने जारी राहिले, परंतु त्यांना वाचविता आले नाही. आग कशामुळे लागली हे देखील अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली होती, याची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ कर्मचारी आणि हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि संपत्ती संरक्षण एजेन्सीसमवेत अनेक यंत्रणांनी बचाव अभियान सुरू केले होते. यादरम्यान कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या लोकांसाठी इमारतीच्या तळघरात खोल्या निर्माण करण्यात आल्या होत्या, जेथे लोक अडकून पडल्याचे समोर आले. परंतु इमारतीतून निघणाऱ्या धुरामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हैदराबदाच्या गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह यांनी रविवारी दौरा केला आहे.