आजकाल केसांच्या समस्या वाढल्या आहेत. लांब आणि दाट केसांसाठी तुम्ही खोबरेल तेल केसांना लावत असाल तर त्यात एक घटक मिसळल्यास फायदा होतो. घरोघरी सहज उबलब्ध असलेले मेथी दाणे खोबरेल तेलात घालून केसांना लावल्यास केसगळती कमी होते.
केस गळती अनेक कारणांमुळे होते, जसे की ताण, हार्मोनल बदल, गर्भधारणा, थायरॉईड समस्या, व्हिटॅमिन्सची कमतरता, लोह, जस्त, काही औषधे, रासायनिक केसांच्या उत्पादनांचा जास्त वापर अशी अनेक केळगतीची कारणे असू शकतात. केस गळती रोखण्यासाठी मेथीचे दाणे आणि खोबरेल तेल वापरू शकता. मेथी दाणे केसांच्या वाढीसाठी चांगले असतात. त्यात प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड असते, जे केस गळती कमी करते आणि केसांच्या वाढीस चालना देते.
कसे वापरावे
मेथीचे दाणे खोबरेल तेलात भिजवा. किंवा खोबरेल तेलात गरम करून घ्या. नंतर तेल गाळून एका बाटलीत ठेवा. ते तुमच्या केसांना लावा आणि आठवड्यातून दोनदा मालिश करा. त्यानंतर, २-३ तासांनी सौम्य शाम्पूने केस धुवा. यामुळे केसगळती कमी होते आणि केस मजबूत देखील होतात.
असे होतात फायदे: