2 – जगातील सर्वात रहस्यमयी जागे पैकी एक नॉर्थ सेंटीनल आयलँड आहे. येथील सेंटिनलीज आदिवासींचा निवास आहे. या आदिवासी जमाती अजूनही जगाच्या पासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे भारत सरकारने या जमाती आणि बाहेर लोक अशा दोन्हींच्या सुरक्षेसाठी या बेटावर पर्यटकांवर संपूर्ण बंदी आहे. पर्यटक या बेटाला केवळ दुरुन पाहू शकतात.
3 – अमरनाथ यात्रेच्या वेळी भक्तांना गुहेपर्यंत जाण्यास परवानगी दिलेली असते. मात्र, गुहेतील काही भागात मात्र पर्यटकांना संपूर्ण मज्जाव आहे. या स्थानाला पवित्र मानले जात आहे. आणि धार्मिक महत्वामुळे सुरक्षेसाठी तसेच गर्दी नियंत्रणासाठी येथे प्रवेश मर्यादित असतो.
4 – सियाचिन ग्लेशियर ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. येथे भारत-पाकिस्तानची सीमा असल्याने सुरक्षेसाठी हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. प्रतिकूल हवामान आणि सुरक्षासाठी पर्यटकांना येथे जाण्यास बंदी आहे. केवळ सैन्यदल आणि पूर्व परवानगी दिलेले संशोधकच येथे जाऊ शकतात.सियाचीन बेस कँपजवळ सिव्हील पर्यटन सुविधा सर्व सामान्य पर्यटकांसाठी खुली आहे मात्र येथे जाण्यासाठी विशेष परवानगी लागते.
5 – अरुणाचल प्रदेशात काही संरक्षित वनक्षेत्रात पर्यटकांना प्रवेश प्रतिबंधीत आहे. या भागात आदिवासी गट आणि विलुप्तप्राय प्रजाती, सारखे दुर्लभ ऑर्कीड आणि वन्यजीवांचे संरक्षण करायचे आहे.पर्यावरण आणि आदिवासींच्या जीवनशैलीवर काही प्रभाव पडू नये यासाठी येथे जाण्यासाठी स्थानिय प्रशासनाकडून पूर्व परवानगी घ्यावी लागते.