पुणे: पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दीप्ती मगर चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शनिवारी रात्री गळफास(Pune Crime News) घेऊन आत्महत्या (Pune Crime News)केली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आत्महत्या (Pune Crime News) केलेल्या विवाहिची सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती देखील मिळत आहे. या प्रकरणी मृत दिप्तीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिला होत असलेल्या मानसिक तसेच शारिरीक त्रासाचा पाढा वाचला आहे, तर तिच्या सासरच्या मंडळीची विकृत मानसिकतेतून तिला गर्भपात देखील करायला लावल्याचं संतापजक सत्य समोर आलं आहे.(Pune Crime News)
पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मृत विवाहिता दिप्तीच्या आईने तिला होणाऱ्या त्रासाचा आणि जाचाचा पाढाच वाचला आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलंय की, अंदाजे नोव्हेंबर 2025 मध्ये माझी मुलगी दिप्ती ही माहेरी आली असताना ती प्रचंड मानसिक रित्या खचलेली व नाराज असलेली दिसत होती. तेव्हा मी दिप्तीला तू खूपचं नाराज दिसत आहे असं विचारलं तेव्हा तिने मोठ्याने रडू लागली तेव्हा मी जवळ घेवून शांत केले व काय झाले आहे असे विचारले असता तिने मला सांगितले की, माझे पोटातील पाच महिन्याच्या बाळाची माझा इच्छेविरूध्द मला पहिली मुलगी असल्या कारणास्तव जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी करावयाची आहे असे माझे पती यांनी मला सांगितले. तेव्हा मी त्यास स्पष्टपणे नकार दिल्याने त्या कारणावरून माझे पतीने मला हाताने मारहाण व शिवीगाळ दमदाटी केली.
तेव्हा माझी सासु सुनिता व सासरे कारभारी हे सुध्दा मला म्हणाले की, आम्हाला आमच्या वंशाला दिवा हवा आहे, तु तपासणी करणार नसेल तर आमचे घरातुन चालती हो असे म्हणाल्याने व तु त्याबाबत तुझे माहेरी सांगु नको असे म्हणून दमदाटी केलेली आहे. त्यानंतर माझे पती रोहन व सासु सुनिता, सासरे कारभारी यांनी दबाव टाकल्यामुळे मी त्याच्या मर्जीनुसार माझी इच्छानसताना गर्भलिंग तपासणी केली तेव्हा माझे पोटातील बाळ हे मुलगी असल्याचे समजल्यावर माझे पती रोहन, सासु सुनिता व सासरे कारभारी व दीर रोहित यांनी माझी इच्छा नसताना जबरदस्तीने माझा गर्भपात केला आहे, असे तिने मला सांगितले तेव्हा मला धक्का बसला परंतु मी तिला आधार देत समजावुन सांगितले व शांत केले.
माझी मुलगी दिप्ती हिस तिचा पती 1) रोहन कारभारी चौधरी 2) सासु सुनिता कारभारी चौधरी 3) सासरे कारभारी चौधरी 4) दीर रोहित कारभारी चौधरी सर्व रा. कडवस्ती सोरतापवाडी ता. हवेली जि. पुणे यांनी माझी मुलगी दिप्ती हिला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून हुंड्याची मागणी करून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी मागणी केली, पैसे घेवून त्रास दिला, जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडून तसेच तिला टोचून बोलुन या सर्व दिलेल्या त्रासाला व छळाला कंटाळून माझी मुलीने राहत्या घरी आत्महात्येस प्रवृत्त केले आहे, मुलीच्या आत्महत्येस तिचे पती, सासु, सासरे व दीर हे कारणीभुत झाले आहेत म्हणून माझी 1) रोहन कारभारी चौधरी 2) सासु सुनिता कारभारी चौधरी 3) सासरे कारभारी चौधरी 4) दीर रोहित कारभारी चौधरी सर्व रा. कडवस्ती सोरतापवाडी ता. हवेली जि. पुणे यांचे विरुध्द तक्रार आहे.
उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन वर्षाच्या मुलीसमोरच इंजिनियर विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहन चौधरी असे पतीचे नाव आहे तर सुनीता चौधरी सासूचे नाव आहे, कारभारी चौधरी सासरे तर रोहित चौधरी दिराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केल्याचं बोलंल जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. अधिकचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 2019 ला यांचा विवाह झाला होता लग्नामध्ये 50 तोळे सोने देण्यात आले होते. नंतर विवाहितेवर वेगवेगळे आरोप करण्यात आले, त्यात तिच्या चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली काम येत नाहीत असे वेगवेगळे आरोप केले आहेत तिचा छळ करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश, गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र तरीही त्रास संपला नाही अखेर दीप्तीने काल रात्री गळफास लावून केली आत्महत्या केली आहे. आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
आणखी वाचा