महिलेच्या अज्ञानपणाचा फायदा घेत ऑनलाईन 15 हजार रुपये लुटले; अलिबागमध्ये मनसेकडून प्रारप्रांतीय तरुणाला चोप
गणेश म्हाप्रळकर January 27, 2026 12:13 PM

Raigad Crime News: रायगडच्या अलिबागमधून (Alibag) एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात एका प्रारप्रांतीय तरुणाने महिलेच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्याच्या मित्राला चक्क 15 हजार रुपये पाठवल्याचे प्रकार (Crime News) घडलाय. अलिबाग येथील वरसोलीमध्ये असणाऱ्या हॉटेल वाइब येथे काम करणाऱ्या एका मराठी महिलेसोबत हा प्रकार घडलाय. तिथेच काम करत असलेल्या एका प्रारप्रांतीय तरुणाने महिलेच्या मोबाईलमधून त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्याच्या मित्राला चक्क 15 हजार रुपये पाठविले. या मराठी महिलेच्या ही बाब लक्षात येताच महिलेने थेट मनसे कार्यालय गाठलं आणि मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे यांना हा सगळा घडलेला प्रकार सांगितला, म्हात्रे यांनी क्षणाचा विलंब न करता हॉटेल वाइब गाठलं आणि या तरुणाला याप्रकरणी जाब विचारून चांगलाच चोप दिला.

त्यानंतर महिलेला ही सगळी रक्कम त्या तरुणाकडून पुन्हा मिळवून देण्यात मनसेला यश आल्याची माहिती आहे. मात्र हॉटेल मालकानं अशा परप्रांतीय तरुणांना विना कागदपत्राशिवाय हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप देखील मनसेने केलाय. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Raigad : रायगडच्या पुनाडे घाटात पर्यटकांच्या वाहनाचा अपघात, 5 प्रवाशी जखमी 

किल्ले रायगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला रायगड-मानगाव रोडवरील पुनाडे घाटात अपघात झाल्याची घटना समोर आलीय. या अपघातात एकूण पाच प्रवाशी जखमी झालेत. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने माणगाव रायगड रोडवरील पुनाडे येथील अवघड वळणावर हा अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातातील जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड येथे उपचार सुरू आहेत.

Buldhana Crime : खामगाव शहरा नजीक असलेल्या वाडी परिसरात सशस्त्र दरोडा, चार दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद

खामगाव शहरा नजीक असलेल्या वाडी परिसरात मयंक अग्रवाल आणि मनोज अग्रवाल यांच्या घरावर चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी रात्री घरात प्रवेश करत घरात असलेले पिता-पुत्रावर चाकू व तलवारीने हल्ला केला. यात दोन्ही पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चार दरोडेखोर हे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांचे वरिष्ठ अधिक अधिकारी स्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले आहे यामुळे खामगाव शहर व परिसरात मोठ्या दहशतीचे वातावरण निर्माण झालं असून पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

आणखी वाचा 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.