पुणे : पुणे शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढल्याचं चित्र दिसून येत आहे, अशातच हिंजवडी आयटी पार्कमध्ये काल (सोमवारी, २६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (Hinjewadi Road Accident) माणुसकीचं दर्शन दिसून आलं, परिसरात एक हृदयद्रावक (Hinjewadi Road Accident) घटना घडली त्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. आपल्या कुटूंबासह रस्त्यावरती फुगे आणि छोटे मोठे साहित्य विकून पोट भरणाऱ्या एका १४ वर्षाच्या मुलाला भरधाव ट्रकने चिरडल्याची संतापजनक घटना घडली आहे. मात्र, त्याच वेळी परिसरातून जात असलेल्या आयटी कर्मचाऱ्यांची तत्परता आणि प्रशासनाच्या समन्वय यामुळे या मुलाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.(Hinjewadi Road Accident)
रविवारी सकाळी सुमारे दहा वाजता हिंजवडी परिसरात जड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही एका वेगाने धावणाऱ्या ट्रकने फुगे विकणाऱ्या अल्पवयीन मुलाला जोरदार धडक दिली. या अपघातात मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. घटनेनंतर तेथून जाणाऱ्या आयटी (Hinjewadi Road Accident) कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने मुलाला आपल्या वाहनातून पिरंगुट येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचार नाकारण्यात आले. त्यानंतर सूस परिसरातील रुग्णालयातही जागा उपलब्ध नसल्याने उपचार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या.(Hinjewadi Road Accident)
अखेर दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास मुलाला पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे उपचारात विलंब होण्याची शक्यता असताना, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (FITE) या संघटनेने पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. म्हसे यांनी तातडीने संचेती रुग्णालयाचे डॉ. पराग संचेती यांच्याशी चर्चा केली. परदेशात असतानाही डॉ. संचेती यांनी तत्काळ उपचारांचे निर्देश (Hinjewadi Road Accident) दिले. त्यानंतर मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.(Hinjewadi Road Accident)
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत हिंजवडी पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. जड वाहनांवर बंदी असतानाही आयटी पार्क परिसरात वाहन नेल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रसंगी आयटी कर्मचारी आशुतोष पांडे, प्रशांत पंडित आणि पवनजीत माने यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलाचा जीव वाचला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.(Hinjewadi Road Accident)