Kaccha Badam Fame Anjali Arora Boyfriend Arrest:‘काचा बादाम’ गाण्यामुळे रातोरात लोकप्रिय झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली अरोडा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या व्हिडीओंमुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत येते. मात्र, यावेळी अंजली स्वतः नव्हे तर तिचा कथित बॉयफ्रेंड आकाश संसनवाल याच्यामुळे ती चर्चेत आहे. कारण मेरठमध्ये आकाशला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश संसनवाल आपल्या आलिशान कारवर आमदार-खासदारांचे बनावट स्टिकर लावून फिरत होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर कारवाई करण्यात आली. 26 जानेवारी रोजी आकाशसह आणखी चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या लक्झरी गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर आकाश नेमका कोण आहे, तो काय करतो, याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
आकाश संसनवाल प्रथम 2022 साली चर्चेत आला होता, जेव्हा तो अंजली अरोडासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसला होता. अंजली अनेकदा त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघांनी एकत्र चारधाम यात्राही केल्याचं समोर आलं होतं. काही काळ साखरपुड्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, अंजलीने त्या अफवा फेटाळत दोघे चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं. तरीही आकाश तिच्या आयुष्यात खास स्थानावर असल्याचं तिने मान्य केलं होतं.
आकाश संसनवाल हा डिजिटल कंटेंट क्रिएटर असून तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे सुमारे 79 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. याशिवाय, त्याचं भाजपाशी संबंधित असलेलं एक वेगळं पेज आहे. या पेजवर तो भाजप नेते रमेश बिधुरी यांचे फोटो आणि पोस्ट शेअर करतो. सोशल मीडियावरील रील्स आणि राजकीय नेत्यांच्या प्रमोशनमधून त्याची कमाई होत असल्याचं सांगितलं जात आहे.