Prarthana Behere Shreyas Talpade and Myra Vaikul Come Together Again: काही टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर तयार करतात. मालिका संपली तरीही त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात जिवंत असतात. काही मालिका आपल्या घराशी जोडली जातात. अशीच एक झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं होतं. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळालं होतं. या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होते. तर, बालकलाकार मायरा वायकुळला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेतील सर्व पात्र प्रचंड गाजली. ही मालिका बंद होताच प्रेक्षकांचा हिरमोड झाला. दरम्यान, या मालिकेतील पात्रांबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि मायरा वायकुळ हे तिघं पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. छोट्या पडद्यावर नसून, ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील तीन पात्र लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तिघांची ही केमिस्ट्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रेयस तळपदेच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर नुकताच लाँच करण्यात आला आहे. श्रेयसचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर लाँच करण्यात आला आहे. मर्दिनी असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटातून नारी सामर्थ्याची गाथा दाखवण्यात येणार आहे.
View this post on Instagram
श्रेयस तळपदे प्रस्तूत अॅफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. मर्दिनी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, हा सिनेमा 3 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या पोस्टरमधून एक ठाम पावलाचं उग्र रूप आणि ज्वालांनी वेढलेलं मर्दिनी हे नाव पाहायला मिळत आहे. या पोस्टरवरून या चित्रपटाची कथा नेमकं कोणत्या कथेवर आधारीत असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
मर्दिनी या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, जितेंद्र जोशी, अभिजीत खांडकेकर, राजेश भोसले यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकतील. मुख्य म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ देखील प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय मयेकर यांनी केले असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मिकीखाली हा चित्रपट साकारण्यात येत आहे. दरम्यान, पोस्टर रिलीज होताच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.