Bollywood Actor Govinda Dances: बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा सिनेसृष्टीपासून दूर आहे. चाहते त्याची पुन्हा सिनेमात येण्याची वाट पहाताय. दरम्यान गेल्या काही दिवसापासून गोविंदाची मोठी चर्चा रंगताना पहायला मिळतेय. गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने गोविंदावर अनेक आरोप केलेत.
दरम्यान अशातच गोविंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका शाळेच्या कार्यक्रमाला गोविंदाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. यावेळी गोविंदाने त्याच्या सुपरहिट गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. त्याच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये गोविंदा युपी वाला ठुमको लगाओ, तसंच तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना पहायला मिळतोय. यावेळी गोविंदाने मुलासोबत गाणी सुद्धा गायली. तसंच विद्यार्थ्यांनी देखील त्याच्या गाण्याला दाद दिली. सध्या सोशल मीडियावर गोविंदाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
परंतु या व्हिडिओनंतर गोविंदाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी कमेंट्स करत लिहलं की, 'वेळ कोणालाही सोडत नाही. प्रत्येकावर वेळ येते.' तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहलं की, 'काय परिस्थिती आली याच्यावर शाळेत जाऊन गाणी म्हणावी लागताय.' परंतु गोविंदाच्या चाहत्यांनी ट्रोलिंगला विरोध करत त्यांच्यातला साधेपणा दाखवून दिलाय.
'अश्विनी ये ना...' गाण्यावर कमळीचा भन्नाट डान्स, हृषीनं सुद्धा दिली साथ, Viral Video