६ फेब्रुवारीला नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा होणार
मुंब्रात आज जितेंद्र आव्हाडांचा नागरी सत्कार, बाईक रॅलीकाढून शक्तिप्रदर्शनराष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज त्यांच्या कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील मुंब्रा भागात होणार नागरी सत्कार तर बाईक रॅलीचे आयोजन..
मुंब्रा परिसरात ठीक ठिकाणी नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने भले मोठे पुष्पहार लावले असून जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात येणार आहे..
या नागरी सत्काराच्या माध्यमातून आव्हाड निवडणुकीनंतर प्रथमच मुंब्रा परिसरात शक्तिप्रदर्शन करणार आहेत..
एम आय एम पक्षाचे पाच उमेदवार मुंब्रा भागातून निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका या नगरसेवकांनी आव्हाडांवर केली होती. आव्हाड या सर्व टिकेना आज सभेच्या माध्यमातून काय उत्तर देतील याकडे लक्ष आहे.
Chandrapur: १०फेब्रुवारीला ठरणार चंद्रपूरचा महापौरचंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरीता १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी, या निवडणुकीच्या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती केली आहे. सकाळी ११ वाजता मनपातील राणी हिराई सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Jalgaon: जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरीजळगाव
जळगावात अवकाळी पावसाची हजेरी
सलग दोन ते तीन दिवसांपासून जळगावमध्ये ढगाळ वातावरण होते..
आज सायंकाळच्या सुमारास जळगाव शहर पाऊस
अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शक्यता
वाऱ्यासह अवकाळी पऊसाला सुरुवात
Mumbai: विक्रोळीत टागोर नगरमध्ये चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू; उपचार नाकारल्याचा आरोप करत रुबी हॉस्पिटलला घेरावविक्रोळीतील टागोर नगर परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील एका चार वर्षांच्या मुलीच्या अंगावर स्पीकर पडून ती गंभीर जखमी झाली होती.
जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी जवळील रुबी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी न करता तिला पुढील रुग्णालयात पाठवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
उपचारात झालेल्या दिरंगाईमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिक व नातेवाईकांनी आज रुबी हॉस्पिटलला घेराव घालून जाब विचारला.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.
पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन, मंत्री गिरीश महाजनांचा निषेधपुण्यात वंचित बहुजन आघाडीचे निषेध आंदोलन
मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात आंदोलन
काल २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अधिकृत कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध
महाजन गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
वंचित बहुजन आघाडी व सर्व विंग्स पुणे शहर, विधानसभा, प्रभागातील आजी–माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत
पुणे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन
Pune : दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण चौधरी कुटुंबीयांसह मगर कुटुंबीयांवर सुद्धा गुन्हा दाखलदीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण
चौधरी कुटुंबीयांच्या पाठोपाठ मगर कुटुंबीयांवर सुद्धा गुन्हा दाखल करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर संघटिका रेखा कोंडे यांचं मतं
हुंडाबळी साठी जसे सासरचे लोक जबाबदार आहेत तसेच माहेरचे लोक जबाबदार असल्याचं मत
दीप्ती ला सासरी पाठवणाऱ्या माहेरच्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल करावा तेव्हाच समाजामध्ये योग्य संदेश जाईल की पोटची मुलगी ओझं नसतं, कोंडे यांचं मत
Dhule: धुळ्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरीअवकाळी पावसाची जोरदार हजेरी
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात नरडाणा परिसरामध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले
जवळपास अर्धा तास चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती
अवकाळी पावसामुळे गहू, मक्का, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती
सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ
मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोला मंजुरी, ६ महिन्यांत भूसंपादनाचे आदेशमुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोद्वारे जोडण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेतला. मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या प्रकल्पामुळे प्रवाशांना जलद, सुलभ आणि पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
Pune: पुण्याचा महापौर 11 फेब्रुवारीला ठरणारपुण्याचा नवा महापौर 11 फेब्रुवारी रोजी निश्चित होणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून मिळाली आहे. आज नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांची महत्त्वाची बैठक होत असून गटनेत्याची निवड आजच केली जाणार आहे. मात्र महापौर निवडीसाठी अजून वेळ लागणार आहे. महापौर पदासाठी रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, ऐश्वर्या पठारे, रत्नमाला सातव आणि मंजुषा नागपुरे यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान भाजपच्या प्रमुख नेत्यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Pune: दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाईदीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट
पुण्यातील निरामय रुग्णालय प्रशासनाची पोलिसांकडून चौकशी
आरोपी रोहन चौधरी आणि सुनीता चौधरी यांना घेऊन पोलिसांकडून रुग्णालयाचा पंचनामा
पुण्यातील वडगाव शेरी भागात आहे निरामय रुग्णालय
चौधरी कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन दीप्ती ने केली होती या रुग्णालयात गर्भलिंग तपासणी
मुलगी असल्याचं निदान झाल्यावर चौधरी कुटुंबीयांनी व्यक्त केली होती नाराजी
चौधरी कुटुंबीयांनी दीप्ती ला गर्भपात करण्यासाठी टाकला दबाव, मगर कुटुंबीयांचा फिर्यादीत उल्लेख
Beed: बीडमध्ये सरपंचाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकावर हल्लाबीड -
- बीडमध्ये सरपंचाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकावर हल्ला
- बीडच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आज दुपारी ही घटना घडली
- बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांच्यावर हल्ला
- बीड तालुक्यातील मौज गावचा सरपंच संदिप डावखर यांनी केला हल्ला
- अश्लील शिवीगाळ करत दगडाने देखील मारहाण केली
- माझ्या गावातील लोकांचे कामे तू का करतो? असा जाब विचारत हा प्राणघातक हल्ला करण्यात आला
Solapur: अनगर नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, 7 ते 9 यावेळेत गावकऱ्यांनी मोबाईल न वापरण्याचा महत्वपूर्ण निर्णयसोलापूर -
- सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
- अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी रोज संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत गावकऱ्यांनी मोबाईल न वापरण्याचा, टीव्ही न पाहण्याचा घेतला महत्वपूर्ण निर्णय
- मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी यासाठी घेण्यात आला निर्णय
- 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या नगराध्यक्षांच्या नूतन संकल्पनेचे ग्रामस्थांकडून स्वागत
Chandrapur: विजय वडेट्टीवार यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेटचंद्रपूर -
चंद्रपूर महापालिकाबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
मातोश्री वर दोन्ही नेत्यांमध्ये ३० मिनिट चर्चा झाली
Parbhani: परभणीत लाँग मार्च समितीकडून गिरीश महाजन यांच्याविरोधात आंदोलनपरभणी -
नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने आता राज्यात याचे पडसाद उमटत आहेत.
परभणीत लाँग मार्च समितीकडून गिरीश महाजन यांच्या विरोधात आंदोलन केले आहे.गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आलाय.
तसेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातुन त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
Sindhudurg: सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनाला धक्का, भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध विजयीसिंधुदुर्ग -
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का.
वैभववाडी कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध विजयी.
ठाकरे शिवसेनेचे उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी घेतला अर्ज मागे.
तर कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचायत समितीत ठाकरेगटाच्या धनश्री मेस्त्री व अपक्ष उमेदवार नीरज मोर्ये यांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपाच्या उमेदवार हर्षदा वाळके बिनविरोध.
Mumbai: विक्रोळीत ३ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोघांविरोधात गुन्हामुंबई -
विक्रोळीमध्ये स्पीकर अंगावर पडून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान घडली घटना
मंडळाचे अध्यक्ष विनोद हर्जी परमार आणि चिंधीवाला सय्यद गुरन या दोघांविरोधात गुन्हा दाखल
Chandrapur: चंद्रपूरमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार, महापौर आमचाच होणार - विजय वडेट्टीवारनागपूर -
- चंद्रपुरात सत्ता काँग्रेस स्थापन करणार
- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती
- काँग्रेसचा महापौर होणार, ते कसे होईल हे येणारा काळ सांगेल...
- कोण कोणाला भेटले, ते आम्हालाही भेटून गेले
- भाजपने मुस्लिम लीग सोबत तयारी केली तर बरोबर आम्ही केली तर चालत नाही ...
- अचलपूर मध्ये भाजपने सत्तेसाठी युती केली,आम्ही स्वीकृत नगरसेवक पदासाठी केली तर त्यात चूक काय?
Nashik: आदिवासी शेतकऱ्यांच्या लाल वादळाच्या शिष्टमंडळाला घेण्यासाठी गिरीश महाजन यांचे सहकारी संदीप जाधव दाखलनाशिक -
- आदिवासी शेतकऱ्यांच्या लाल वादळाच्या शिष्टमंडळाला घेण्यासाठी गिरीश महाजन यांचे सहकारी संदीप जाधव दाखल
- शिष्टमंडळाला घेऊन संदीप जाधव मुंबईला निघणार
- लाल वादळाच्या लाँग मार्चवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाली
Nagpur: नागपूरमध्ये 34 नगरसेवकांना घेऊन काँग्रेसने आपला गट स्थापन केलानागपूर -
- नागपूर 34 नगरसेवकांना घेऊन काँग्रेसने आपला गट स्थापन केला
- नागपूरच्या विभागीय कार्यालयात जाऊन कॉंग्रेसने 34 नगरसेवक यांचा गट स्थापन केला आहे.. तसेच MIM असो की मुस्लिम लीग, उबाठा यातील समविचारी पक्षाना सोबत घेण्या संदर्भात चर्चा आहे..
- यावेळी घटस्थापन करत गटनेता म्हणून संजय महाकाळकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे आणि तशी नोंदणी ही करण्यात आली आहे...
- त्यामुळे मनपा सभागृहामध्ये गटनेते संजय महाकाळकर हे विरोधी पक्षनेता हेच जबाबदारी सांभाळणार असल्याचं आमदार तथा शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितलं आहे...
Nagpur: भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला प्रकरण, ११ जणांवर मकोकाअंतर्गत कारवाईनागपूर -
- नागपूर महापालिकेतील प्रभाग 11 मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणेवरील हल्ल्याचे अपडेट
- 15 हल्लेखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे...
- भाजप उमेदवार भूषण शिंगणेवर महापालिका मतदानाच्या पूर्वीच्या रात्री ( 14 - 15 जानेवारीच्या दरम्यानची रात्र) जबर मारहाण करत हल्ला करण्यात आला होता..
- दुसऱ्या दिवशी म्हणजेच मतदानाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी नागपुरात मतदान केल्यानंतर भूषण शिंगणेच्या घरी भेट देत पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते...
- आतापर्यंत या प्रकरणी 15 आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे...
KDMC: कल्याण शहर विकास आघाडी नावाने गटाची नोंदणी होणार, भाजप नगरसेवकाची माहितीनवी मुंबई -
कल्याण-डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक दिपेश म्हात्रे
कल्याण डोंबिवली मधील भाजप नगरसेवकांची नोंदणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत
कल्याण शहर विकास आघाडी या नावाने गटाची नोंदणी करण्यात येणार आहे
महायुतीला कुणाच्या मदतीची गरज नाही
मनसेला शिवसेने का बरोबर घेतले हे मला सांगता येणार नाही.
Akola: अकोला मध्ये महानगरपालिकेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालीला वेग....अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटस्थापनेच्या पडताळनी साठी दाखल....
अकोला महानगरपालिकेमध्ये एकूण 80 नगरसेवकांचा संख्याबळ.. त्यापैकी 38 जागा भाजपने जिंकल्या आहे...
विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप सोबत राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष सोबत असल्याचा दावा...
शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत असल्याचा दावा भाजपने केला आहे...
तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे...
Thane: ठाण्यातील भाजपचे २८ नगरसेवक कोकण भवनात दाखलठाण्यातील भाजपचे 28 नगरसेवक कोकण भवनात दाखल
भाजप नेते निरंजन डावखरे देखील कोकणभवनात आले आहेत
गट नोंदणीसाठी कोकण भावनात दाखल
Pandharpur: माढ्यात पंचायत समितीच्या माजी सभापती यशोदा ढवळे यांची माघारमाढ्यात पंचायत समितीच्या माजी सभापती यशोदा ढवळे यांची निवडणूकीतून माघार....
शिवसेनेच्या उमेदवार सविता कोकाटे यांना पाठिंबा...
यशोदा ढवळे यांनी बेंबळे जिल्हा परिषद गटातून शरद पवार गटातून दाखल केला होता उमेदवारी अर्ज...
ऐनवेळी ढवळे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने उलट सुलट चर्चांना उधाण...
शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांच्या पत्नी सविता कोकाटे यांना शरद पवार गटाच्या यशोदा ढवळे यांचा पाठिंबा....
Wardha: वर्ध्यात काँग्रेसच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धावर्ध्यात काँग्रेसच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा
वर्धा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने स्पर्धकांनी घेतला गीत गायन स्पर्धेत सहभाग
स्पर्धकांकडून एकापेक्षा एक उत्कृष्ट देशभक्तीपर गीताचे गायन
जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर व इतर मान्यवरांची उपस्थिती
विजेत्या स्पर्धकांना करण्यात आले पारितोषिकाचे वितरण
गीत गायन स्पर्धेला वर्धेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
Akola: अकोला मध्ये महानगरपालिकेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालीला वेग....अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आणि अपक्ष नगरसेवकांच्या तटस्थापनेच्या पडताळनी साठी दाखल....
अकोला महानगरपालिकेमध्ये एकूण 80 नगरसेवकांचा संख्याबळ.. त्यापैकी 38 जागा भाजपने जिंकल्या आहे...
शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत असल्याचा दावा भाजपने केला आहे...
तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
KDMC: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवानाकेडीएमसीत सत्ता हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना
कल्याण–डोंबिवली महापालिकेतील भाजपचे ५० निवडून आलेले नगरसेवक करणार एकत्र प्रवास
डोंबिवलीतील जिमखाना परिसरातून कोकण भवनाकडे करणार कूच
महापालिकेत अधिकृत गट स्थापन गट अध्यक्ष पदी शशिकांत कांबळे यांची नियुक्ती
महापौर महायुतीचा असणार इतर पदासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शिवसेनेचे नेते एकत्र बसून चर्चा करणार
भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि गटनेते शशिकांत कांबळे यांची माहिती
Anand Dighe: शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची ७४ वी जयंती..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिघे हे राजकीय गुरू असून शिंदे व असंख्य शिवसैनिक आज दिघेंना अभिवादन करण्याकरिता शक्तिस्थळावर येणार आहेत..
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे व असंख्य UBT मधील कार्यकर्ते देखील आज दिघेंना अभिवादन करण्याकरिता त्यांच्या ठाण्यातील शक्ती स्थळावर येणार आहेत..
त्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे..
दिघेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या ठाणे येथील शक्तिस्थळावर मोठ्या प्रमाणात फुलांची आरस करण्यात आली असून भजन स्पर्धा ठेवण्यात आली आहे...
आनंद दिघे यांची जुनी आरमाडा चार चाकी वाहन देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना व नागरिकांना पाहण्याकरिता प्रमुख आकर्षण म्हणून ठेवण्यात आले आहे..
Vasant More: निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नाही, वसंत मोरे यांची पुणे कोर्टात याचिकावसंत मोरे यांनी पुणे कोर्टात याचिका केली दाखल
निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नाही
निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल
सगळ्यांनी संगनमत करून मशीन बदलल्या आहेत आणि आकडेवारी मध्ये तफावत आहे
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वसंत मोरे यांची याचिका दाखल
मुंबई हाय कोर्ट ऐवजी केली पुणे कोर्टात याचिका दाखल
Eknath Shinde: जिल्हा परिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी उद्या एकनाथ शिंदे सोलापूरातसोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धुरळा पाहायला मिळणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे सभा..
एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवस सोलापूर शहरात असणार मुक्कामी..
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाची अनेक तालुक्यात वेगवेगळ्या आघाड्या..
बार्शी आणि माढा तालुक्यातील शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे पक्षांमध्ये आघाडी केल्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे..
एकनाथ शिंदे उद्या सोलापुरात असणार मुक्कामी..
Sindhurdurg: पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे शिवसेना व शिंदेच्या शिवसेनेत थेट लढतसिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्ष लागून राहिलेल्या पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदेची शिवसेना व ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांमध्ये थेट लढत होत असून दोन्ही पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत व शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा सचिव असलेले दादा साईल यांच्यात एकासएक लढत होत असून या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे शिवसेनेकडून पावशी मतदारसंघात डोअर टू डोअर प्रचारावर भर देण्यात आला असून शिंदेच्या शिवसेनेकडून खळा बैठकांवर जोर देण्यात आला आहे. गेल्या जिल्हा परिषदेत याठीकाणी ठाकरे शिवसेनेचे अमरसेन सावंत विजयी झाले होते. यावेळी मात्र शिवसेना फुटीनंतर दोन शिवसेनेतच लढत होत असून दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी विजयाचा चंग बांधला आहे.
जालन्यात खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग, सुदैवाने जिवितहानी नाहीजालन्यात खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील शेलगाव गावाजवळ पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
ट्रॅव्हल्सच्या टायरचे घर्षण झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये 27 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पुण्यावरून खाजगी बस यवतमाळच्या दिशेने जात असतानी ही घटना घडली आहे. दरम्यान अग्निशामक दलाने दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली होती...
नव्या हंगामातील चिया पिकाची वाशिम बाजार समितीत आवक सुरूरब्बी हंगामात कमी खर्चात पारंपरिक पिकांपेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या चिया पिकाकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल मोठ्याप्रमाणात वाढला आहे. नव्या हंगामातील चिया पिकाची वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक सुरू झाली असून चियाला कमाल २१ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले आहेत.हा दर दिलासा देणारा असून शेतकरी समाधानी आहेत.. सध्या मर्यादित प्रमाणात आवक होत असली तरी येत्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे..
शेतकरी मजुरांनी केले प्रकाश आणि मोबाईल चार्जसाठी जुगाड पहापोटाची खळगी भरण्यासाठी शेत शिवारात काम शोधत भटकंती करणाऱ्या वनमजुरांनी झोपडी मध्ये लख्ख प्रकाश आणि मोबाईल मध्ये चार्जिंग करण्यासाठी भन्नाट जुगाड केले आहे, हिंगोली तालुक्यातील ईसापुर रमण्याच्या जंगलात या मजुरांनी सोलार प्लेटच्या मदतीने झोपडी मध्ये प्रकाशाची व्यवस्था केली आहे, दिवसभर पोट भरण्यासाठी कष्ट करून आल्यानंतर रात्र झोपडी मधील अंधारात काढणाऱ्या या मजुरांनी जुगाड केल्याने आता मात्र त्यांना प्रकाश मिळू लागला आहे.
कुडाळ पणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आगकुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा येथील सिद्धिविनायक इंटरप्राईजेस या हार्डवेअर दुकानास आग लागण्याची घटना मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. या दुकानास लागलेल्या आगीत प्लास्टिक, पाईपस व इतर सामान जळून खाक झाले. दुकानाला लागलेली आग एवढी मोठी होती की, लोखंडी पाईप्स, अँगल पूर्णतः वाकून गेले. तर या आगीत टाटा कंपनीच्या डीआय वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली याचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.
उपसरपंच जमील पटेल यांचे ग्रामपंचायत समोर २६ जानेवारीपासून आमरण उपोषणअमरावती जिल्ह्यातील दारापूर व खेलनागवे परिसरात सन फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शासकीय निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप दारापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच जमील पटेल यांनी केला आहे. संबंधित कामे ठेकेदार विलास बननोटे यांनी केली असून,या कामांचा दर्जा अत्यंत निष्कृष्ट असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या आहेत.
आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ थोड्याच वेळात घाटनदेवीहून मुंबईकडे कूच करणार- नाशिकहून निघालेलं आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ थोड्याच वेळात घाटनदेवीहून मुंबईकडे कूच करणार
- रात्री घाटनदेवी परिसरात कडाक्याच्या थंडीत आदिवासी शेतकऱ्यांचा मुक्काम
- सध्या आदिवासी आंदोलकांची चहा, नाश्ता बनवण्याची लगबग
- नाश्ता झाल्यावर आदिवासी आंदोलक थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होणार
Maharashtra Live News Update: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्जदहावी- बारावीची परीक्षा उंबरड्यावर आली आहे.या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून यंदा दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी तर बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियान राबवले जाते यंदाही हे अभियान राबवले जाणार आहे.सध्या सरावा तसेच प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहे.लेखी परीक्षेसाठी मोजके दिवस शिल्लक असल्याने शिक्षकांकडून परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
रायगडात महायुती फुटण्यास सुनील तटकरे जबाबदारनगर पालिकेप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देखील रायगड जिल्ह्यात महायुती होण्याची शक्यता मावळली आहे. आणि याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुनील तटकरे यांनीच केलं आहे कारण त्यांना शिवसेना आणि भाजपची जी पारंपारिक युती आहे ती होऊ द्यायची नव्हती, असा गंभीर आरोप आमदार दळवी यांनी केलाय.
अजित पवार गटाचा भाजपला धक्काकर्जत येथील भाजपचे युवा पदाधिकारी सागर शेळके यांनी अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळे स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला फायदा होणार आहे त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का आहे अनेक पदाधिकाऱ्यांनी युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अजित पवार गटांमध्ये पक्षप्रवेश केलाय त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय
महापौर निवड, गट नेते पदासाठी भाजपची आज पुण्यात बैठकभाजपच्या सर्व नगरसेवकांची उपस्थितीत बैठक
पुणे महानगरपालिकेत गटनेता ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक
पुण्यात भाजपच्या 119 नगरसेवकांचा झाला विजय
निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसोबत स्थानिक नेते घेणार बैठक