विमान धावपट्टीवरुन बाजूला गेलं, अन्...; अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कुठे आणि कसा झाला?
अंकिता खाणे January 28, 2026 01:43 PM

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात (Ajit Pawar Baramati Plane Crash) झाला. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला भीषण (Ajit Pawar Baramati Plane Crash) आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिली आहे.(Ajit Pawar Baramati Plane Crash)

विमानाचा अपघात नेमका कुठे आणि कसा झाला?

अजित पवार कॅबीनेटच्या बैठकीसाठी ते मुंबईत आलेले होते, त्यानंतर आज ते आज सकाळी ते मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात आदळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.(Ajit Pawar Baramati Plane Crash)

या विमानाच्या दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते, मात्र आज त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला.(Ajit Pawar Baramati Plane Crash)

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून (DGCA) या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर नेतेमंडळींना देखील अश्रू अनावर झाले.(Ajit Pawar Baramati Plane Crash)

विमानात कोण कोण होते? 

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे ठरलेले कार्यक्रम

(बुधवार दि.२८ जानेवारी २०२६)

सकाळी १०.०० ते  सायंकाळी ७ वाजेपर्यंत: 
जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभा...
बारामती तालुक्यातील...
 निरावागज (सकाळी १० वाजता),
 पणदरे (दुपारी १२ वाजता), 
करंजेपूल ( दुपारी ३ वाजता),
 सुपा येथे (सायं.५.३० वाजता)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.