भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. यामुळे भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली. भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करण्यावर भर दिला. त्यामध्येच भारताने अमेरिकेला आता सळो की पळो करून सोडले आहे. 18 वर्षाच्या मोठ्या काळानंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात करार झाले. ज्यामुळे भारतात काही वस्तू आता थेट स्वस्त होणार आहेत. काही उत्पादनांवरील कर कपात आणि थेट टॅरिफ रद्द करण्यावर सहमती झाली. भारतावर मागील काही काळापासून अमेरिकेचा प्रचंड दबाव आहे. त्यामध्येच भारताने अमेरिकेला मोठा धक्का दिला. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील ऐतिहासिक व्यापार करारानंतर अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया आलीये. अमेरिका या व्यापार करारांवर नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. शेवटी अमेरिकेने प्रतिक्रिया याबाबत दिली आहे.
अमेरिकेने या कराराला फायदेशीर म्हटले असून भारतासाठी हा करार खूप जास्त फायदेशीर असल्याचे अमेरिकेने स्पष्ट शब्दात म्हटले. अमेरिकेचे प्रतिनिधी ग्रीर यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नक्कीच भारत या करारांमध्ये आघाडीवर राहिला आहे. त्यांच्या मते, भारताला युरोपीय बाजारपेठांमध्ये पूर्वीपेक्षा आता खूप जास्त प्रवेश मिळाला आहे .
फक्त हेच नाही तरभारतीय नागरिकांना युरोपमध्ये स्थलांतराच्या संधी वाढल्याचेही त्यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून भारतीयांना अमेरिकेत येऊन नोकऱ्या करण्यापासून रोखण्यासाठी H-1B व्हिसाच्या नियमात सातत्याने बदल केली जात आहेत. यासोबतच शुक्लामध्ये वाढ केली आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील करारामुळे भारताला अनेक फायदे झाली आहेत.
नक्की कोण कोणते करार होणार याकडे जगाच्या नजरा होत्या. या करारांमुळे कारच्या किंमतीही कमी होणार आहेत. अमेरिकेकडून भारतावर निर्बंध लादले जात असतानाच भारताने ही अत्यंत मोठी बाजी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. युरोपियन युनियनचे प्रमुख भारताच्या दाैऱ्यावर होते. 26 जानेवारीलाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणूनही त्यांनी उपस्थिती लावली होती.