Baramati Plane Crash Ajit Pawar Death : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारयांचं निधन झालं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज (ता. २८) बारामती येथे सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजितदादा आज सकाळी मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते.
हे विमान बारामतीविमानतळावर उतरत असताना अपघात होऊन ते धावपट्टीवरुन घसरुन जवळच्या दरीत कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने (DGCA Statement) या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित दादा गेले… पण शेवटच्या क्षणापर्यंत कामात गुंतलेला माणूस, अपघात झालेल्या ठिकाणी कागदपत्रे-फाईल्स विखुरलेल्या अवस्थेतदरम्यान, या घटनेनंतर पिंपरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी फेसबूक पोस्टव्दारे दु:ख व्यक्त केलं आहे. लांडगे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलंय, 'ही सकाळ सुन्न करणारी आहे! राजकारणातल्या मोकळ्या ढाकळ्या नेत्याचं असं जाणं धक्कादायक आहे. प्रशासनावर असलेली पकड आणि मिश्किल - स्पष्ट स्वभाव यामुळे अजितदादा लोकप्रिय होते. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे', असं सांगत त्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.