Ajit Pawar Plane Crash: मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी अजित पवार यांची शेवटची पोस्ट
Tv9 Marathi January 28, 2026 04:46 PM

Ajit Pawar Plane Crash: बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. अजित पवारांची अशी एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते शेतात कोसळलं. अपघातात अजित दादा यांच्यासोबत अन्य दोन जणांचं देखील निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशात अजित पवार यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील सर्वत्र व्हायरल होत आहे.

अजित पवारयांनी बुधवारी सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी ट्विट केलं होतं. आता अजित पवार यांची पोस्ट एक्सवर दिसत नसली तरी, पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. महान स्वातंत्र्य सेनानी, पंजाब केसरी लाला लजपत राय यांना जयंतीदिनी अभिवादन करणारं ट्वीट त्यांनी केलं.

पंजाब केसरी लाला लजपत राय यांचा फोटो पोस्ट करत अजित पवार म्हणाले, ‘राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे, महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक, ‘पंजाब केसरी’ लाला लाजपत राय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची राष्ट्रनिष्ठा आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील…’, सध्या अजित पवार यांची शेवटची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) धक्कादायक माहिती दिली आहे.

अजित पवार यांचा राजकारणातील प्रवास…

पवार हे महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिले आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. अजित पवार पहिल्यांदा 199 1मध्ये बारामती संसदीय मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आणि नंतर त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडली.

अजित पवार बारामती मतदारसंघातून सात वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यांनी पहिल्यांदा 1991 मध्ये पोटनिवडणूक जिंकली आणि त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये विजयी झाले. आता अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.