मोठी बातमी! आणखी एका विमानाचा भीषण अपघात टळला, माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले
admin January 28, 2026 08:24 PM
[ad_1]

महाराष्ट्रात मोठा विमान अपघात घडला आहे, या विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. अजित पवार हे मुंबईवरून विमानानं बारामतीला निघाले होते, मात्र धावपट्टीवर विमान उतरवताना नियंत्रण सुटलं आणि हे विमान जमिनीला धडकल्याची माहिती समोर येत आहे, त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. दरम्यान ही विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला आहे. जयपूरमध्ये ही घटना घडली आहे, एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झाल्याची घटना घडली आहे. या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा हे देखील प्रवास करत होते. या घटनेतून ते थोडक्यात वाचले आहेत. एअर इंडियाचं हे प्लेन दिल्लीवरून जयपूरला निघाले होते.

दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँड

समोर आलेल्या माहितीनुसार एअर इंडियाचं विमान AI – 1719 दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी जयपूर एअरपोर्टवर पोहोचलं. त्यानंतर या विमानानं विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र हे विमान जसं धावपट्टीवर उतरलं तसं त्याचं लँडिंग फेल झालं. धावपट्टीवरील खराब स्थिती किंवा काही तांत्रिक समस्येमुळे या विमानाचं पहिलं लँडिंग फेल झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या विमानाचं पहिलं लँडिंग फेल होताच पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. विमान जसं रन वेला टच झालं, त्यानंतर लगेचच पायलटने प्लेन ला गो अराउंड केलं. तब्बल 10 मिनटं हवेत घिरट्या घातल्यानंतर अखेर दुसऱ्या प्रयत्नामध्ये या विमानाचं धावपट्टीवर सुरक्षित लँडिग झालं आहे. या विमानातून प्रवास करणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधवा हे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

गो-अराउंड काय आहे?

एअरपोर्ट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लँडिंग करताना जर पायलटला विमानाचं लँडिंग सुरक्षित होणार नाही असं वाटलं तर तो पुन्हा एकदा विमान हवेत उडवतो आणि त्यानंतर पुन्हा सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला जातो, हे विमान अखेर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँड करण्यात आलं आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.