3 की 4 मार्च होळी कधी आहे? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर
admin January 28, 2026 08:24 PM
[ad_1]

रंगांचा सण होळी हा आनंद आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे. 2026 मध्ये होळीच्या तारखेबद्दल अनेक चर्चा सुरू असतात. तर अनेकवेळा काहीजण तारखांमध्ये गोंधलेले असतात कि यंदा 3 मार्च रोजी येईल की 4 मार्च रोजी होळी साजरी करावी. तर तुम्हीही या संभ्रमात असाल तर ही बातमी विशेषतः तुमच्यासाठी आहे. या वर्षी एक दुर्मिळ खगोलीय घटना, चंद्रग्रहण, होळीच्या दिवशी देखील होणार आहे ज्यामुळे या सणाचे महत्त्व आणखी वाढेल. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त तसेच धुलिवंदनची नेमकी तारीख कोणती आहे ते जाणून घेऊयात.

द्रिक पंचांग आणि ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या वर्षी पौर्णिमेची तारीख दोन दिवसांपर्यंत वाढत आहे. म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हेालिका दहन होळी साजरी केली जाणार आहे तर दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजेच धुलिवंदन साजरी केली जाते.

होलिका दहन: 3 मार्च 2026 मंगळवार

धुळवड म्हणजेच धुलिवंदन: 4 मार्च 2026 बुधवार

पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी सुरू होईल आणि 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजून 07 मिनिटांनी संपेल. होलिका दहन प्रदोष काळाच्या वेळी सूर्यास्तानंतर केले जात असल्याने होळीचा सण 3 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. तसेच धुळवड (धुलिवंदन) ४ मार्च रोजी साजरी केली जाईल.

होळीवर चंद्रग्रहणाची छाया

ग्रहण तारीख: 03 मार्च 2026

चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल आणि 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत चालेल. त्याचा एकूण कालावधी अंदाजे 3 तास ​​27 मिनिटे असेल. त्यामुळे चंद्रग्रहण हा चंद्र उगवण्यापूर्वीच संपणार आहे.

चंद्रग्रहणाचा सुतक काळात काय करावे आणि काय करू नये?

हे ग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक काळ देखील वैध असेल. धार्मिक श्रद्धेनुसार सुतक काळात पूजा आणि स्वयंपाक करण्यास मनाई आहे, परंतु ग्रहण संपल्यानंतर शुद्धीकरणानंतर होलिका दहनाचा विधी करता येतो.

होळीचे महत्त्व

होळी हा केवळ रंगांचा खेळ नाही तर तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक देखील आहे. हा दिवस भगवान विष्णू यांचा एक समर्पित भक्त प्रल्हादच्या संरक्षणाचे आणि अहंकारी हिरण्यकशिपू आणि त्याची बहीण होलिकाच्या अंताचे स्मरण करतो. होळी हा वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करणारा आणि हिवाळ्याला निरोप देणारा उत्सव देखील आहे. या दिवशी लोक जुने वैर विसरून एकमेकांना मिठी मारतात आणि होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.