न्यूझीलंडने विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममधील चौथ्या टी 20I सामन्यात यजमान टीम इंडियासमोर 216 धावांचं विक्रमी असं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी सलामी जोडीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि टीम सायफर्ट या दोघांनी शतकी भागीदारी केली. तसेच इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 215 धावांपर्यंत पोहचता आलं. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया 216 धावांचा यशस्वी पाठलाग करत सलग चौथा विजय साकारणार की न्यूझीलंड जिंकणार? हे थोड्याच वेळात निकालानंतर स्पष्ट होईल.