नगरपंचायत कार्यालय नातेपुते
नातेपुते ः नातेपुते नगरपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन आणि संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पालखी मैदानावर ध्वजवंदन नगराध्यक्षा अनिता लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील सर्व शाळामधील विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम आणि संचलन सादर केले. तसेच अनेक शाळांनी चित्ररथ केले. यावेळी उपनगराध्यक्ष अतुल पाटील, मुख्याधिकारी विकास शिंगाडे, नगरसेवक माजी उपाध्यक्ष मालोजीराजे देशमुख, माया उराडे, भानुदास राऊत, संगीता काळे, शर्मिला चांगण, सुरेंद्र सोरटे, रणजीत पांढरे, अण्णा पांढरे, रावसाहेब पाढंरे, अविनाश दोशी, यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.