'ती आपली शेवटची भेट...'; अजित दादांसमोर किशोर कुमारचं गाणं गाणाऱ्या प्रसिद्ध गायक भावुक, उलगडला प्रसंग
भाग्यश्री कांबळे January 29, 2026 04:13 PM

Rahul Vaidya Pays Emotional Tribute to Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले.  त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.  नेते मंडळींसह सिनेकलाकारांनाही मोठा धक्का बसला.  अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी त्यांना श्रध्दांजली वाहिल. तसेच पोस्टद्वारे शोक व्यक्त केला आहे. गायक राहुल वैद्य यानेही एका व्हिडिओद्वारे अजित पवार यांना श्रध्दांजली वाहिली. राहुलने अजित पवार यांचा एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला. तसेच त्यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीची आठवण शेअर केली.

 राहुल वैद्य यांनी सोशल मीडियावर एका कार्यक्रमाचा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये राहुल एका कार्यक्रमात दिसत आहे. त्याच्यासमोर पाहुण्यांमध्ये अजित पवार बसले आहेत. व्हिडिओमध्ये राहुल 'मेरे जीवन साथी' या चित्रपटातील किशोर कुमार यांचे प्रसिद्ध गाणे 'ओ मेरे दिल के चैन' गाताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अजित पवार राहुलच्या लाईव्ह परफॉर्मन्सचा आनंद घेताना दिसत आहेत. 

 राहुल वैद्यची अजित पवार यांच्यासाठी खास पोस्ट

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RAHUL VAIDYA (@rahulvaidyarkv)

व्हिडिओ शेअर करत राहुलने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिलं की, "6 डिसेंबर 2025.  अजित दादा जवळजवळ 2 तास सतत एकामागून एक त्यांच्या आवडत्या गाण्यांची विनंती करत राहिले.  मी कधीच कल्पना केली नव्हती की ही त्यांची शेवटची भेट असेल.  अजित दादा आपल्याला सोडून खूप लवकर गेले.  ते कायम लक्षात राहतील. दादा.. तुमच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.." असं कॅप्शन देत राहुलनं  दादासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सध्या राहुलची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजित पवार यांच्या विमानाचे बारामतीत अपघात झाले. त्यांचं 66 व्या वर्षी निधन झाले.   चार्टर्ड विमान धावपट्टीच्या अगदी जवळ कोसळले.   या भीषण विमान अपघातात एकूण 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. आज अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

इकडे बारामतीत अजितदादांना मुखाग्नी दिला, तिकडे पिंकी माळीचं पार्थिव वरळीत पोहोचलं, बायकोला पाहताच पती धाय मोकलून रडला

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.