महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती जवळ विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासोबत इतर चार व्यक्तींचेही प्राण गेले. दादांच्या अकस्मात निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून तीन दिवस राज्यात दुखवटा घोषित करण्यात आला आहे. अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून बारामतीत नागरिक आले होते. दादांच्या जाण्यावर सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दादाच्या अकाली निधनाने त्यांच्या नेतृत्वाखालील राजकारण आणि सार्वजनिक सेवेची आठवण सर्वत्र केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य ते सामान्य नागरिक आक्रोश व्यक्त करतोय. अजितदादांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. म्हणूनच त्यांची अकाली एक्झिट सर्वांसाठी चटका लावणारी ठरली आहे. अजित पवार नावाचं नेतृत्व अनंतात विलीन झालं आहे. एक कुशल नेता आपल्यातून अकाली निघून गेला आहे. राज्यातील अजित पर्व संपलं आहे.