वास्तुशास्त्रात तुमच्या घराची रचना कशी असावी, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घराच्या खिडक्या कोणत्या दिशेला असाव्यात? याबद्दल माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण जेव्हा घर खरेदी करतो, तेव्हा एक गोष्टी आवर्जून पाहिली पाहिजे ती म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे? जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तर असं घर शुभ मानलं जातं, घराचा दरवाजा उत्तर दिशेला असेल तरी चालतं. मात्र घराचा दरवाजा कधीही दक्षिण दिशेला असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, तसेच जर घराचा दरवाजा हा दक्षिण दिशेला असेल तर त्यामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. आता हे झालं दरवाजाचं, वास्तुशास्त्रात खिडक्यांबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे, आज आपण लहान मुलांच्या बेडरुमची खिडकी कोणत्या दिशेला असावी? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
लहान मुलांच्या बेडरुमची खिडकी कोणत्या दिशेला असावी?
लहान मुलं हे प्रचंड चपळ, ऊर्जावान असतात. तसेच घरातील नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जेचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलांवरच होत असतो, त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचं पालन केलं तर ते फायद्याचं ठरू शकतं. वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांच्या बेडरुमच्या खिडकची दिशा ही नेहमी पूर्व किंवा पश्चिमेलाच असावी, कारण जर खिडकी ही पूर्व किंवा पश्चिमेला असेल तर त्यातून भरपूर प्रमाणात सूर्य प्रकाश हा बेडरुममध्ये येतो. बेडरुममध्ये त्यामुळे पुरेसा नैसर्गिक प्रकाश राहतो, तसेच जर खिडकी ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तर घरात सतत सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होत राहते, नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो.
बेडरुमची खिडकी कोणत्या दिशेला नसावी?
बेडरुमची खिडकी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी हे आपण जाणून घेतलं, त्या मागची कारणं देखील पाहिली, मात्र आता जाणून घेऊयात बेडरुमची खिडकी कोणत्या दिशेला नसावी? बेडरुमची खिडकी कधीच दक्षिण दिशेला नसावी, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा प्रभाव हा तुमच्या मुलांवर देखील होऊ शकतो, अगदीच पर्याय नसेल तर तुम्ही तुमच्या बेडरुमची खिडकी ही उत्तरेल देखील ठेवू शकता, मात्र खिडकी कधीही दक्षिण दिशेला असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)