3 जानेवारीला संपूर्ण जगाची झोप उडाली होती, जेव्हा अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करण्यात आले होते. अशातच आज व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. हा फोन कॉल एका नवीन राजनैतिक युगाची सुरुवात होती. व्हेनेझुएलाच्या राजकारणात सध्या भूकंप झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदांनी भारत तुमच्या सोबत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी दोन्ही देशांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते जाणून घेऊयात.
भारताचे पंतप्रधान मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यातील हे पहिलेच अधिकृत संभाषण आहे. डेल्सी रॉड्रिग्ज यांनी 5 जानेवारी रोजी कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. डेल्सी व्यवसायाने कामगार वकील आहेत आणि खाजगी क्षेत्राशी समन्वय साधण्यात त्यांना तज्ञ मानले जाते. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या फोन कॉलची माहिती पंतप्रधानांनी X वर शेअर केली आहे. यात PM मोदींनी म्हटले की, दोन्ही देशांनी द्विपक्षीय भागीदारीला नवीन उंचीवर नेण्याचे मान्य केले आहे. भारतासाठी व्हेनेझुएला हा केवळ व्यापारी भागीदार नाही तर ऊर्जा सुरक्षेचा एक प्रमुख स्रोत आहे. दरम्यान या कॉलच्या माध्यमातून मादुरो यांती सत्ता गेल्यानंतर भारताने नवीन सरकारसोबत संतुलित संवाद साधून दोन्ही देशांमधील हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत सरकारने या दोन्ही नेत्यांच्या फोन कॉलनंतर एक प्रेस रिलीज जारी केले आहे. या कॉलमुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांमध्ये एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षा यासारख्या धोरणात्मक क्षेत्रात त्यांची भागीदारी आणखी मजबूत करण्याचे मान्य केले. तसेच डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य, शेती आणि सांस्कृतीक सलोख जपण्याचा संकल्प केला. प्रेस रिलीजमध्ये ग्लोबल साउथमधील विकसनशील देशांमधील एकतेवर भर देण्यात आला. तसेच भारत आणि व्हेनेझुएला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर एकमेकांना पाठिंबा देतील असेही यावेळी ठरले आहे. तसेच बदलत्या जागतिक परिस्थितीत दोन्ही सतत संवाद साधतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारवाईनंतर देशाला सावरण्याची जबाबदारी आता डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यावर आहे. त्यांचे भाऊ जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी यांनी राष्ट्रीय असेंब्लीचे प्रमुख म्हणून शपथ घेतली आहे. भारत सध्या ग्लोबल साउथमध्ये आघाडीची भूमिका बजावत आहे. या दोन्ही नेत्यांमधील फोनमुळे दोन्ही देश कठीण काळात एकमेकांना सहकार्य करत राहतील हे समोर आले आहे.