T20i World Cup 2026 साठी यूएई संघ जाहीर, भारताला चॅम्पियन करणाऱ्या दिग्गजाला मोठी जबाबदारी
GH News January 31, 2026 01:13 AM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी शुक्रवारी 30 जानेवारीला दुसरा संघ जाहीर करण्यात आला आहे. यूनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिका अर्थात यूएसएनंतर आता यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मुहम्मद वसीम यूएईचं नेतृत्व करणार आहे. तसेच यूएसएप्रमाणे यूएई टीममध्येही भारतीय वंशाच्या खेळाडूंचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच टीम इंडियाला 2007 सालचा पहिलाच वर्ल्ड कप जिंकून देण्यात पडद्यामागून निर्णायक भूमिका बजावणाऱ्या दिग्गजावर यूएईने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

यूएईचा तिसरा टी 20i वर्ल्ड कप

यूएईचं नेतृत्व करणारा मुहम्मद वसीम हा अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. वसीम हा यूएईसाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. यूएईची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. यूएई 2014 साली आपला पहिला टी 20i वर्ल्ड कप खेळली होती. तर यूएई 2022 साली अखेरीस टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाली होती. मात्र यूएईचं दोन्ही वेळेस साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे यूएईसमोर यंदा चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे.

भारतीय वंशाचे 5 खेळाडू

यूएई टीममध्ये भारतीय वंशाचे 5 खेळाडू आहेत. यामध्ये आर्यांश शर्मा, ध्रुव पराशर, हर्षित कौशिक, मयंक कुमार आणि सिमरनजीत सिंह यांचा समावेश आहे.

लालचंद राजपूत हेड कोच

टीम इंडियाचे माजी खेळाडू लालचंद राजपूत हे यूएईचे हेड कोच आहेत. लालचंद राजपूत यांच्याच मार्गदर्शनात भारताने 2007 साली पहिल्याच झटक्यात टी 20i वर्ल्ड कप उंचावला होता.

यूएईसमोर कुणाचं आव्हान?

यूएईचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. यूएईसमोर साखळी फेरीत कॅनडा, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे.

यूएईचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना केव्हा?

दरम्यान यूएई टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 10 फेब्रुवारीला खेळणार आहे. यूएईसमोर या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. हा सामना चेन्नईत आयोजित करण्यात आला आहे.

यूएईच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोण कोण?

टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी यूएएई टीम : मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, आर्यांश शर्मा (विकेटकीपर), ध्रुव पराशर, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीक, मयंक कुमार, मुहम्मद अरफान, मुहम्मद फारुक, मुहम्मद जवादुल्ला, मुहम्मद जोहैब, रोहिद खान, सोहेब खान आणि सिमरनजीत सिंग.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.