पुन्हा एकदा तिला डोळे भरून पाहण्याआधीच… आईचा आर्त टाहो, काळीज चिरणाऱ्या शब्दाने सर्वच हादरले
admin January 30, 2026 11:25 PM
[ad_1]

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे, या अपघातात एअर होस्टेस पिंकी माळी यांचेही निधन झाले होते. पिंकी माळी यांच्या पार्थिवावर काल वरळीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज मंत्री छगन भुजबळ यांनी पिंकी माळी यांच्या वरळी इथल्या राहत्या घरी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये वैयक्तिक मदत केली आहे. तसेच आजच मुख्यमंत्र्यांकडे सरकारच्या वतीने कुटुंबाला मदत करण्यासाठी सांगितलं जाणार आहे अशी माहिती दिली.

शिवकुमार माळी याच्या काळजाचा ठोका चुकला

एका बाजूला राजकारण तापलेलं असतानाच, एका भीषण अपघाताने माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एअर होस्टेस पिंकी माळी, जिने आपल्या स्वप्नांना गवसणी घातली होती, ती आज आपल्यात नाही. नशिबाचे खेळ कधी कसे फिरतील याचा नेम नसतो. पिंकीचे वडील शिवकुमार माळी यांच्यासाठी तो दिवस एखाद्या काळरात्रीसारखाच ठरला. सकाळी त्यांना मित्राचा फोन आला, बातमी होती की ‘अजितदादा गेले’. राजकारणातल्या घडामोडी समजून शिवकुमार यांनी विचारलं, ते कोणत्या पक्षात गेले? पण समोरून उत्तर आलं, टीव्ही लाव… अपघातात मृत्यू झालाय!

शिवकुमार माळी सांगतात, मी टीव्ही 9 लावला आणि काळजाचा ठोका चुकला. अजितदादांसोबतच माझ्या पोटच्या गोळ्याचा, माझ्या पिंकीचाही त्या अपघातात मृत्यू झाल्याची बातमी झळकली. आम्ही पूर्णपणे हादरलो, हातबल झालो. अपघातानंतर बारामतीतील सरकारी रुग्णालयात पिंकीचा मृतदेह ठेवण्यात आला होता. कुटुंबावर आभाळ फाटलं होतं. अशा वेळी सचिनभाऊ आहेर यांनी माळी कुटुंबाला आधार दिला. त्यांनी पुढाकार घेत पिंकीचा मृतदेह मुंबईला पाठवण्याची व्यवस्था केली.

आईचा आक्रोश

टीव्ही 9 शी बोलताना पिंकीच्या आईचा टाहो काळजाला घर पाडणारा होता. ‘माझी मुलगी मला बरेच दिवस भेटली नव्हती. ती सासरवाडीला होती. तिला पुन्हा एकदा डोळे भरून पाहण्याआधीच देवाने तिला हिरावून नेलं’, असं म्हणताना आईचे अश्रू थांबत नव्हते. पिंकी माळी यांच्या निधनानंतर माळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. छगन भुजबळ यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. आता सरकारकडूनही मदत होईल अशी आशा माळी कुटुंबाला आहे.

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.