Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. देशात आणि राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप मालेगावात मात्र सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मालेगावात काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत गट स्थापन केला आहे. भारत विकास आघाडी नावाने हा गट स्थापन केला आहे.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे तीन तर भाजप चे दोन नगरसेवक निवडून.आले आहेत. काँग्रेस व भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये महापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. देशात आणि राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मालेगावात मात्र सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मालेगावात काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत गट स्थापन केला आहे. भारत विकास आघाडी नावाने गटाची स्थापना केली आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे तीन तर भाजप चे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस व भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाने सर्वाधिक 35 जागा जिंकत बाजी मारली आहे. इस्लाम पक्षाने समाजवादी पक्षासोबत युती केली होती त्यांना 5 जागा मिळाल्या. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटला शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले पण बहुमताचा 43 हा जादुई आकडा पार करण्यासाठी कुणाचा तरी पाठिंबा आवश्यक होता. या निवडणुकीत भाजप पूर्णपणे तोंडघशी पडली आहे. मंत्री दादा भुसे यांनी महायुतीचा धर्म पाळत युतीसाठी हात पुढे केला होता, मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि काही नव्या चेहऱ्यांनी युती न करण्याचा घेतलेला टोकाचा निर्णय भाजपला महागात पडला, असे स्पष्ट झाले आहे. भाजपने या निवडणुकीत 20 उमेदवार उभे केले होते, मात्र त्यातील 18 उमेदवारांचा दारुण पराभव झाला, तर केवळ 2 उमेदवार विजयी होऊ शकले.
इस्लाम पार्टी – 35
समाजवादी पार्टी – 6
शिवसेना (शिंदे गट) – 18
एमआयएम – 20
काँग्रेस – 3
भाजप – 2
शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), वंचित आघाडी, आप, बसपा या पक्षांना एकही जागा जिंकता आलेली नाही.