आग विझविणाऱ्या युवकांचा सत्कार
मलकापूर, ता. ३० : आगाशिवनगर झोपडपट्टी येथे फ्रिजचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घराचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांचा येथील पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत आगाशिवनगर दांगटवस्ती येथे धनाजी पाटणकर यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीतून चार युवकांनी पूर्ण भरलेला गॅस सिलिंडर व पेट घेतलेल्या फ्रिज ओढून बाहेर काढला. जीव धाेक्यात घालून आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना होणारी टाळली.
शुभम कांबळे, मयूर खंडागळे, बाबा जावळे व शाहीद शेख या युवकांचा सत्कार नगराध्यक्ष तेजस सोनवले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी कपिल जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सूरज शेवाळे, नगरसेवक शरद पवार, शहाजी पाटील, सुनील खैरे, कृष्णत तुपे, अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संघटनेचे कऱ्हाड शहराध्यक्ष सनी जावळे, प्रसन्न मोरे, अभी सुरवसे उपस्थित होते.
.....
A01248
मलकापूर : आग विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांचा सत्कार करताना तेजस सोनवले. त्या वेळी मनोहर शिंदे, कपिल जगताप आदी.
...........................