नागपूर : शाळा हे शिक्षणाचे मंदिर मानले जाते, मात्र नागपुरात याच मंदिराला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेने अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १०९८ चाईल्ड हेल्पलाईनच्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या संघर्ष नगर, पिली नदी परिसरात राहणारी ही विद्यार्थिनी एका स्थानिक शाळेत इयत्ता सातवीत शिकते. २२ जानेवारी रोजी हिंदी विषयाचा तास सुरू असताना, मैत्रिणीकडून आरसा घेऊन दुसऱ्या विद्यार्थिनीला देत असताना शिक्षिकेचा पारा चढला. संबंधित शिक्षिका श्रीमती तसलीम परवीन यांनी मुलीला कोणतेही कारण न देता ५ ते ६ जोरात थपडा मारल्या आणि वर्गाबाहेर काढले.
धक्कादायक बाब म्हणजे, यानंतर मुख्याध्यापिके मुख्याध्यापिका श्रीमती नासरीन अख्तर यांनी तिला कार्यालयात बोलावून स्टीलच्या स्केलने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या हाता-पायावर गंभीर जखमा झाल्या असून ती प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे.
Chh. Sambhajinagar: अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हाताला चटके; वाळूजमध्ये नशेखोरांचा उच्छाद, महिला, मुली, ज्येष्ठांना रोजचाच त्रास चाईल्ड हेल्पलाईनचा पुढाकारमुलीच्या वडिलांनी सुरुवातीला शाळा प्रशासनाकडे दाद मागितली, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.अखेर २५ जानेवारी रोजी '१०९८ चाईल्ड हेल्पलाईनकडे तक्रार प्राप्त झाली. चाईल्ड हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी तातडीने मुलीच्या घरी भेट देऊन तिचे समुपदेशन केले आणि जबाब नोंदवले.
पोलिसांत गुन्हा दाखलचाइल्ड हेल्पलाइन द्वारे संबंधित यशोधरा नगर पोलिस स्टेशन येथे सदर प्रकरणाबाबत माहिती दिली.व २६ जानेवारी ला पोलिसांनी मेयो हॉस्पिटलमध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी केली. २७ जानेवारी रोजी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जरी मुलीच्या वडिलांनी कायदेशीर प्रक्रियेबाबत भीतीपोटी काहीशी अनिच्छा दर्शवली असली, तरी बालकांचे गांभीर्य लक्षात घेऊन चाईल्ड हेल्पलाइनचे प्रतिदिनी यांनी स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दिली.
Nagpur Bench : 'परस्पर सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार ठरवता येणार नाही'; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णयया प्रकरणात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५:** कलम ७५आणि भारतीय न्याय संहिता (BNS)115(2),118(1), 3(5), व RTE 2009 कलम 17 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. ही कार्यवाही ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण. चाईल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी मंगला टेंभुर्णे, अनिकेत भिवगडे व मीनाक्षी धडाडे यांनी ही कार्यवाही केली.