Riteish Deshmukh Slams Rakesh Bapat and Divya Shinde: बिग बॉस मराठी सिझन 6 ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. या सिझनमधील स्पर्धकांमुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत येत आहे. भाऊचा धक्का या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख प्रचंड नाराज असल्याचं दिसून आलं. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख अत्यंत संतापात दिसत आहे. यावेळी त्याने राकेश बापट आणि दिव्या शिंदेला स्पष्ट शब्दांत झापलं. यावेळी त्याने 'घरात लाडका भाऊ योजना सुरू आहे', असं म्हटलं आहे. त्यानं केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या एपिसोडचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कलर्स मराठीने शेअर केलेला प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख अत्यंत संतप्त दिसत आहे. राकेशवरून रितेश देशमुखने दिव्याची शाळा घेतली असल्याचं पाहायलं मिळालं. यावेळी रितेशने दोघांना स्पष्ट शब्दांत सुनावलं. "इथे सतत राकेश दादा, राकेश दादा ते.. एवढंच दिसत आहे. तुमचा काही गेम दिसतच नाही", असं रितेश म्हणतात. यावेळी राकेश आणि दिव्या दोघेही शांत बसतात. यावेळी रितेश देशमुख दिव्या शिंदेला 'तुम्ही बाहेर लीडर आहात ना?', असा प्रश्न विचारतात. तेव्हा दिव्या शिंदे रितेश देशमुखला 'हो सर' असे उत्तर देते. तेव्हा रितेश, 'बाहेर लीडर असलात तरी, तुम्ही केवळ सपोर्टर म्हणूनच दिसत आहात.. म्हणजेच राकेश यांच्या प्रवक्ताच बनल्यासारखं वाटतंय', असं दिव्याला म्हणतात.
View this post on Instagram
रितेश देशमुख राकेश आणि दिव्या यांची शाळा घेत असताना दोघेही मान खाली घालून बसतात. रितेश दिव्याला सुनवत असताना, रूचिता खुश होते. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. दरम्यान, या प्रोमो रिलीज होताच काही जण दिव्याला सपोर्ट करत आहेत. दिव्यानं स्वतंत्र खेळावं, असं काही नेटकरी म्हणत आहेत. तर, काहींनी अनुश्रीला घरातून काढण्याची मागणी केली आहे. या आठवड्यात नेमकं घरातून आऊट होणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'हे एक षडयंत्र..बरोबर ना?' अजित पवार यांच्या निधनावर राखी सावंतचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?