Bigg Boss Marathi Promo Goes Viral: जस जसे दिवस उलटत आहेत, तस तसे मराठी बिग बॉसच्या घरात घडामोडींना वेग आला आहे. भाऊच्या धक्क्यावर दर आठवड्याला रितेश देशमुख सर्वांची शाळा घेतो. मागच्या आठवड्यात राधा पाटील घराबाहेर पडली होती. नंतर भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने अनुश्रीला चांगलंच झापलं असल्याचं पाहायला मिळालं. राधा पाटील घरातून बाहेर पडल्यानंतर अनुश्री मानेचा चांगलाच आवाज चढला होता. त्यामुळे रितेश देशमुखने तिची शाळा घेतली. दरम्यान, या आठवड्यात रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर प्रभू शेळकेला चांगलंच धारेवर धरलं. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
कलर्स मराठीने भाऊच्या धक्क्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख प्रभू शेळकेला झापत असल्याचं दिसून येत आहे. प्रभू शेळके अगदी निमूटपणे ऐकून घेत आहे. या आठवड्यात रितेश देशमुख प्रभू शेळकेला चांगलंच धक्का देणार असल्याचं दिसून येत आहे. रितेश प्रभूला म्हणतो, "प्रभू तुम्ही खरंतर हद्दपार केलीये. तुम्ही स्वत: म्हणाले होतात की, मी 20 वर्षांचा आहे. मला तसंच वागवा. आता मी तुम्हाला तसेच वागवणार आहे".
"2 आठवडे तुमचं प्रचंड कौतुक झालं होतं. तुमचे खूप लाड झाले होते. पण आता तुम्ही लाडात आले आहात. इतरांशी अगदी उद्धटपणे वागत आहात. आता हे बस झालं", असं म्हणत छोटा डॉनला अभिनेता रितेश देशमुखने चांगलंच धारेधर धरलं. कलर्स मराठीने हा व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट करून एकंदरीत समाधान व्यक्त केलं.
View this post on Instagram
एकानं, "बरं झालं भाऊ, तुम्ही बरं केलं. प्रभू काही करत नाही. फक्त टाईमपास करत असतो", अशी कमेंट केली आहे. तर, आणखी एका नेटकऱ्याने, "कुठे सूरज चव्हाण आणि कुठे हा.. हे मला पटलं आहे भाऊ.. भाऊ ऑन फायर", अशी कमेंट केली आहे. तर, काही नेटकऱ्यांनी त्याची बाजू घेतली आहे. "उद्धटपणे? जेव्हा त्याला कुणी काहीही बोलतं, दम देतात, सागर असो किंवा इतर, तेव्हा तुम्हाला दिसत नाही का?" अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात एकूण 8 जणांना नॉमिनेट करण्यात आले आहे. यापैकी एकाला आज बिग बॉसचं घर सोडावं लागेल. सोनाली राऊत, विशाल कोटियन, दीपाली सय्यद, प्राजक्ता शु्क्रे, प्रभू शेळके, ओंकार राऊत, करण सोनावणे आणि रूचिता जामदार..यांच्यापैकी कुणाला घर सोडावं लागणार? हे लवकरच उघड होईल.