सांगली : उच्च सुरक्षा नोंदणी पाटीसाठी (एसएसआरपी) राज्य सरकारच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिलेली मुदत ३१ डिसेंबरला संपली. मुदत संपून महिना उलटला, तरी विभागाने ना मुदतवाढ दिली, ना एकही कारवाई केली. त्यामुळे ‘एचएसआरपी’चा निर्णय अधांतरी ठेवल्याने वाहनधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरसाठी शासनाने पाच वेळेस मुदत वाढवली होती. ३१ डिसेंबरनंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही. त्यानंतर एचएसआरपी नंबर नसलेल्या वाहनांवर थेट कारवाई करण्यात येईल.
HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...असा आदेश काढण्यात आला होता. मात्र, मुदत संपून आज महिना झाला. शासनाने याबाबत कुठलाही वेगळा आदेश काढलेला नाही. २५ डिसेंबर २०२४ ला एचएसआरपी बसवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. ३१ डिसेंबर २०२५ ला मुदत संपली. जिल्ह्यात ४६ फिटमेंट सेंटर आहेत.
मात्र रोज ६०० ते ७०० एवढेच बुकिंग होत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी रोज दोन ते अडीच हजार वाहनांची एचएसआरपीसाठी नोंदणी व्हायची. आता मुदतवाढही नाही आणि पोलिस किंवा आरटीओकडून कारवाई देखील नाही, त्यामुळे नोंदणीचे काम थंडावले आहे. एचएसआरपीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
HSRP ची मुदत संपली! आता थेट कारवाई होणार? RTO चा इशारा, परिवहन विभागानं काय सांगितलं? सांगलीतील ‘एचएसआरपी’ची स्थिती६ लाख ५४ हजार ८११ एकूण वाहनधारक
३ लाख ५३ हजार ३८९ वाहने बाकी
३ लाख १ हजार ४२२ ऑर्डर आल्या
२ लाख ७२ हजार ६४२ प्लेट बसवल्या
२८ हजार ७८० यांच्या प्लेट तयारवाहन ट्रान्सफर करणे, डुप्लिकेट आरसी काढणे, बॅंक बोजा उतरावणे किंवा चढवणे, अशाप्रकारची रोज १०० कामे ‘आरटीओ’मध्ये होत आहेत. त्या वाहनधारकाकडे ‘एचएसआरपी’ची रिसीट असल्याशिवाय कुठलेही काम केले जात नाही.
- प्रसाद गाजरे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई करावी, याबाबत कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही. तसा आदेश आल्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात येईल.
- मुकुंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, वाहतूक.