Epstein Filesमधून नवे धक्कादायक खुलासे; दिग्गजांसोबत प्रसिद्ध दिग्दर्शकाचे नाव चर्चेत
भाग्यश्री कांबळे January 31, 2026 08:13 PM

Epstein Case Mira Nair Mentioned in Documents: एप्स्टाइन फाइल्समुळे केवळ अमेरिकेत नाही तर, संपूर्ण जगात खळबळ उडाली.  शु्क्रवारी एप्स्टाइन फाइलच्या आणखी काही कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.  अमेरिकन अब्जाधीश व्यावसायिक जेफ्री एप्स्टाइनच्या गुन्ह्यांचा तपास करताना आणखी काही नोंदी सापडल्या आहेत.  दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा सार्वजनिक करण्यात आला आहे. या डेटामध्ये साधारण 30 लाखांहून अधिक कागदपत्रे,  छायाचित्रे आणि हजारो व्हिडिओंचा समावेश आहे.  या कागदपत्रातून एक नवं  नाव समोर आलं आहे. या कागदपत्रांमध्ये भारतीय वंशाच्या  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर यांच्या नावाचा देखील समावेश आहे.  त्यांचं  नाव समोर येताच अनेकांना धक्का बसला.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Harvard Undergraduate SAWC (@hu.sawc)

दरम्यान, मीरा नायर यांच्यासह जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि जेफ बेझोल यांची देखील नावे समोर आली आहेत.  दिग्गजांची नावे समोर येताच केवळ भारतातच नव्हे तर, जगात खळबळ उडाली आहे.  प्रसारित झालेल्या फायलींनुसार,  2009मध्ये मीरा नायर यांचा अमेलिया चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले होते.  चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर एका आफ्टर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही आफ्टर पार्टी घिसलेन मॅक्सवेलच्या न्यू यॉर्कमधील घरात आयोजित करण्यात आली होती.  

अलेमिया चित्रपटाच्या आफ्टर पार्टीचा उल्लेख हॉलिवूड प्रचारक  पेगी सिगल यांनी एपस्टाइनला पाठवलेल्या ईमेलमध्ये आहे. या पार्टीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या पार्टीमध्ये माजी राष्ट्रध्यक्ष बिल क्लिंटन, अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस तसेच मीरा नायर देखील उपस्थित होते.   दरम्यान  मीरा नायर यांची उपस्थिती केवळ एका सामाजिक कार्यक्रमापुरती मर्यादित होती,  असं कागदपत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. मीरा नायर यांच्यावर कोणत्याही गु्न्हेगारी कृत्याचा आरोप नाही, असंही त्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मीरा नायर यांचं नाव समोर येताच सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

शाहरूख - सलमानच्या फॅन्ससाठी खुशखबर; तेरे नाम अन् देवदासची जादू पुन्हा सिनेमागृहात अनुभवता येणार, कधी प्रदर्शित होणार?

'आता तुम्ही लाडात आलाय', रितेश देशमुखनं छोट्या डॉनला चांगलंच झापलं; दिला सज्जड दम, प्रोमो व्हायरल

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.