राज्यातील सर्व शाळांवर 'सीसीटीव्ही'चा वॉच; तर केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर सरकारी शाळेतही शिक्षणाचे धडे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची घोषणा
प्रशांत देसाई February 01, 2026 10:43 AM

Bhandara News : मागील काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर अत्याचाराचे (Crime) प्रमाण वाढलेले आहेत. यावर अंकुश बसावा, शिकणाऱ्या विद्यार्थिनी सुरक्षित रहाव्यात, या दृष्टीनं आता महाराष्ट्राचं शिक्षण विभाग महत्त्वाचं पाऊल उचलत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Surveillance) बसवण्यात येणार असून शाळेतील संपूर्ण विद्यार्थी या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत राहणार आहेत. यासोबतच जिल्हा परिषदच्या शाळा कॉन्व्हेंटच्या धरतीवर करण्यासाठी येत्या काळात जिल्हा परिषद शाळेचा सिलॅबस हा सीबीएससीच्या सिलॅबस (CBSC Syllabus) प्रमाणे करणार आहेत. यासोबत केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या (University of Cambridge) धर्तीवर आता येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर (Guardian Minister of Bhandara, Dr. Pankaj Bhoyar) यांनी केली. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कोच्छी इथं जिल्हा परिषद शाळांचे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) बोलत होते.

CBSC Syllabus in Government Schools : जिल्हा परिषद शाळेचा सिलॅबस हा सीबीएससीच्या सिलॅबस प्रमाणे करणार

शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजे, म्हणून संपूर्ण शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. चांगल्या वर्ग खोल्या उपलब्ध झाल्या पाहिजे. डिजिटल क्लासरूम उपलब्ध झाल्या पाहिजे. कॉन्व्हेंटच्या तोडीच्या शाळा या जिल्हा परिषदेच्या ही असल्या पाहिजेत. नगरपालिकेच्या देखील असल्या पाहिजेत. आता पेव फुटलेल्या कॉन्व्हेंटच्या शाळेत, माझा मुलगा शिकला पाहिजे, असं प्रत्येक पालकाला वाटतंय. पर्यायाने इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये प्रत्येक पालक आपल्या पाल्याला पाठवत असतो. कॉन्व्हेंटच्या धरतीवर आता सहकारी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केलेत. येणाऱ्या कालावधीत जिल्हा परिषद शाळेचा सिलॅबस हा सीबीएससीच्या सिलॅबस प्रमाणे करणार आहोत. आपण सीबीएससीचा सिलॅबस घेत नाही आहोत. तर, त्यातील काही चांगले कंटेंट्स आपण घेत आहोत. जेणेकरून जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी देखील त्या स्पर्धेत टिकला पाहिजे. असेही शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले.

Cambridge University : केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर आता सरकारी शाळेमध्ये धडे दिले जाणार

केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या शिक्षण जगातील जवळपास 118 देशांमध्ये चालते. त्याची सुविधा आपल्या सरकारी शाळांमध्ये देऊ शकलो तर, ग्रामीण भागातील मंडळींनाही त्यांचा मुलगा सरकारी शाळेमध्ये शिकते आणि बाजूच्या चा मुलगा सीबीएससी कॉन्व्हेंट मध्ये शिकते हा न्यूनगंड राहणार नाही. केंब्रिज विद्यापीठात सोबत आपलं MOU झालंय. मुख्यमंत्र्यांसोबत सामंजस्य करार झालाय. राज्यातील सर्व शाळांमध्ये आपल्या शिक्षकांमार्फत पहिले आपल्या शिक्षकांचं ट्रेनिंग आणि ते ज्या टिचिंग मेथडने विद्यार्थ्यांना शिकवत असतात आपले शिक्षक देखील त्याच पद्धतीने जिल्हा परिषद नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्वयं उपलब्ध करून देणार असल्याचे हि डॉ. पंकज भोयर म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.