अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 72 हजारांनी स्वस्त, सोन्याच्
Marathi February 01, 2026 12:25 PM

नवी दिल्ली: आज  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला म्हणजे आज देशाचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काल (शनिवारी, ता ३१) सोने, चांदीचे दर घसरल्याचे दिसून आले. बळकट अमेरिकन डॉलरमुळे जागतिक बाजारात सोने-चांदीची (Gold Silver Price Crash) मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल १९ टक्के, तर सोन्याच्या दरात सुमारे २ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.(Gold Silver Price Crash)

चांदीचे दर ३ लाख १२ हजार रुपये प्रति किलो झाले होते, तर सोन्याचे दर १० ग्रॅमला १ लाख ६५ हजार रुपये असा झाला आहे. हे दर सर्व करांसहीत आहेत. गेल्या आठवड्यांमध्ये या सोने-चांदीच्या दरामध्ये झालेली वाढ आता कमी झाली आहे.(Gold Silver Price Crash)

चांदीचे दर आता ३ लाख १२ हजार रुपये प्रतिकिलो

सराफ बाजारामध्ये शनिवारी चांदीच्या दरामध्ये सुमारे १९ टक्के म्हणजे ७२ हजार ५०० रुपयांची घट झाली. चांदीचे दर आता ३ लाख १२ हजार रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. सलग दोन दिवस चांदीचे भाव घसरले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी चांदीचे दर ४ लाख ४० हजार ५०० रुपये प्रति किलो असा झाला होता. मात्र, त्याच आठवड्याच्या शेवटी चांदीच्या दरातील वाढ मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. त्यामुळे गुंतवणुकदरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.(Gold Silver Price Crash)

सोने दरातील घट

सोन्याच्या दरातही घट झाली आहे. शनिवारी सोन्याच्या दरामध्ये ३५०० रुपये म्हणजेच २.०७ टक्क्यांनी घसरले. दिवसअखेरीस सोन्याचा दर १० ग्रॅमला १ लाख ६५ हजार ५०० रुपये असा झाला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी सोन्याचा दर १ लाख ८३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम असा झाला होता. आठवडाभरात झालेल्या विक्रीमुळे तो पूर्वीच्याच पातळीवर आला आहे. यात आणखी घसरण होईल का अशी भीती गुंतवणूदार व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.