LPG Price 1 February: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2026)सादर करतील. पण बजेट सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसाल. आता लोकांना LPG गॅस सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. देशातील प्रमुख ऑईल मार्केटिंग कंपन्या IOC, HPCL आणि BPCL ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. नवीन किंमती रविवारी 1 फेब्रुवारीपासून लागू झाल्या आहेत. तर दुसरीकडे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. या किंमती स्थिर आहेत.
किती वाढला भाव?
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 1 फेब्रुवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात 49 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांच्या खिशावर मोठा भार पडला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने व्यावसायिक, हॉटेल-रेस्टॉरंट मालकांनी चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात सुद्धा सिलेंडरच्या किंमतीत 111 रुपयांची वाढ झाली होती. दुसरीकडे 14.2 किलो वजनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
दिल्लीत किती भाव?
IOC च्या संकेतस्थळानुसार दिल्लीमध्ये 19 किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,740.50 रुपये इतकी झाली. पूर्वी ही किंमत 1,691.50 रुपये होती. आता किंमतीत 49 रुपयांची वाढ झाली आहे. तर सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आला आहे. घरगुती वापरासाठीचा 14.2 किलो वजनी LPG सिलेंडर दिल्लीत आता 853 रुपयांना मिळत आहे. तर BPCL आणि HPCL च्या ग्राहकांना याच किंमतीत सिलेंडर मिळत आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती
कोलकत्तामध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1,844.50 रुपये, तर मुंबईत हे सिलेंडर 1,692.00 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत या किंमती सर्वात महाग आहे. याचा भाव चेन्नईत 1,899.50 रुपये इतकी आहे.
घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किती?
घरगुती 14.2 किलो LPG सिलेंडरचा भाव गेल्या वर्षी 8 एप्रिल 2025 रोजी बदलला होता. तेव्हापासून या किंमती जैसे थे आहेत. दिल्लीमध्ये 853 रुपये, कोलकातामध्ये 879, मुंबईत 852.50 आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपये अशा किंमती आहेत.
प्रत्येक महिन्याला होतो बदल
सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG सिलेंडरची किंमत ठरवतात. त्या आधारे किंमतीत कपात अथवा वाढ होते. जानेवारी 2026 मध्ये व्यावसायिक सिलेंडर महाग झाला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात क्रमशः 10 आणि 5 रुपयांनी भाव घसरला होता. गेल्या काही दिवसांनीसिलेंडरच्या किंमतीत चढउतार दिसून येत आहे.