सोलापूर: पाच हजार मीटरवरून दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) असेल तरच विमान लॅंड करण्यास धावपट्टीवर उतरण्यास परवानगी देण्यात येते. पावसाळा व हिवाळ्यात अशी परिस्थिती अधिक तयार होते. ज्या विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा नाही, त्याठिकाणी असा निर्णय घेण्यात येतो. ज्या विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा आहे, त्या विमानतळावर दृश्यमानतेची अट ५ हजार ऐवजी ८०० मीटर इतकी असल्याचे डीआयजीसीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
Rohit Pawar: रोहित पवार उचलणार शैक्षणिक जबाबदारी! सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या घरी मुलांशी साधला संवाद; पवार कुटुंबीय पाठीशीबारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दृश्यमानता कमी असल्याने धावपट्टीवर न उतरता क्रॅश झाले. यामध्ये पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. याबाबत विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ‘सकाळ’ प्रतिनिधींनी संवाद साधला. बारामती विमानतळावरील दुर्घटना खूपच गंभीर आहे. एका चुकीमुळे इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे.
ज्या विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा नाही, जसे सोलापूर, बारामतीसह इतर विमानतळावर ५ हजार मीटरवरून दृश्यमानता असेल तरच विमान लॅंडिंग करण्यास परवानगी दिली जाते. पण बारामती विमानतळावर ३ हजार मीटरवरूनही दृश्यमानता नव्हती, अशा स्थितीत विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याचा परिणाम विमान दुर्घटनेत झाला असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्या विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा आहे, त्या विमानतळावर दृश्यमानता अंतर हे ८०० मीटर असते. मुंबईसह, पुणे, नागपूर या विमानतळावर सुविधा आहे. पण राज्यातील इतर विमानतळावरील दृश्यमानता ही साधारणत: ३ ते ५ हजार मीटर इतकी असते. ढग, धुके वा पावसाचे वातावरण असल्यास सोलापूर विमानतळावर आम्ही सकाळी ९ च्या आधी विमान उतरवण्यास परवानगी दिली जात नाही. तशी स्थिती बारामती विमानतळावर होती. दृश्यमानता कळण्यासाठीची इतर सुविधा नसल्यानेच अपघात झाल्याची शक्यता असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! तिरुपती-हिसार-तिरुपती विशेष एक्सस्प्रेला मुदतवाढ; नेमक्या कधी सुटणार गाड्या? जागा मिळाल्यावरच नाईट लॅंडिंग...सोलापूर विमानतळावर नाईट लॅंडिंगची मागणी आहे. पण जागेबाबत सुरू असलेला न्यायालयीन वाद, विमानतळाच्या भिंतीशेजारील अतिक्रमण भटक्या कुत्र्यांची समस्या कायम आहे. त्यावर काही प्रमाणात अंकुश आला असला तरी समस्या पूर्णपणे संपलेली नाही. नाईट लॅंडिंगसाठी जी यंत्रणा लावावी लागते, त्यासाठी अतिरिक्त जागेची गरज आहे, याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरेशी जागा मिळाल्यावरच नाईट लॅंडिंगचा विषय मार्गी लागणार आहे.