January End Gold Silver Price Fall : सोने बाजारात ४८ तासांपूर्वी चांदीने भावाचा उच्चांक गाठत ती ‘जीएसटी’सह प्रतिकिलो चार लाखांवर पोहोचली होती, तर सोने (प्रति दहा ग्रॅम) एक लाख ८३ हजार रुपयांवर पोहोचले होते. आतापर्यंतचा भावाचा हा ऐतिहासिक उच्चांक होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत (३० व ३१ जानेवारी) हा वाढलेला भाव कमी झाला आहे. दोन दिवसांत चांदीच्या भावात तब्बल ९० हजार ९०० रुपयांची (प्रती किलो) तर सोन्यात १८ हजार ९०० रुपयांची (प्रतिदहा ग्रॅम) घट झाली आहे.
चांदीच्या भावात गुरुवारी (ता. २९) २४ हजारांची वाढ होऊन ती विनाजीएसटी तीन लाख ९२ हजारांवर पोहोचली होती. ‘जीएसटी’सह चांदी प्रतिकिलो चार लाख तीन हजारांवर गेली होती. चांदीच्या भावात शुक्रवारी (ता. ३०) ४२ हजारांची मोठी घट झाली त्यामुळे ती तीन लाख ९२ हजारांवरून तीन लाख ५० हजारांवर (विनाजीएसटी) पोहोचली होती. ‘जीएसटी’सह चांदी तीन लाख ६० हजारांपर्यंत खाली आली आहे.
चांदीच्या भावात ४७ हजारांची घट झाली. दोन दिवसांत एकूण ९० हजार ९०० रुपयांची घट झाली आहे. आज चांदी जीएसटी’सह ३ लाख १२ हजार ९०० (प्रतिकिलो) रुपयांवर पोचली आहे. सोन्याच्या भावात गुरुवारी (ता.२९) १३ हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ते विना जीएसटी एक लाख ७७ हजार ७०० रुपयांवर पोचले होते.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतात सोन्याच्या दरात ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली. महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उसळी घेतल्यानंतर ३० आणि ३१ जानेवारी २०२६ रोजी सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल दोन दिवसांत १८ हजार रुपयांहून अधिक घसरण झाली. ही आतापर्यंतची भारतातील सर्वात मोठी दोन दिवसांची घसरण मानली जात आहे.
२९ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम जवळपास १ लाख ८० हजार ७७९ रुपयांवर पोहोचला होता. मात्र अवघ्या ४८ तासांत दर मोठ्या प्रमाणात कोसळले. ३१ जानेवारी २०२६ रोजी २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम सुमारे १ लाख ६० हजार ५८० रुपयांवर व्यवहारात होते, जे काही दिवसांपूर्वीच्या उच्चांकी दरांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे.
Gold And Silver Rate: महत्त्वाची बातमी! २०२६ च्या अखेरपर्यंत सोने आणि चांदीचे दर किती असणार? तज्ञांनी आकडाच सांगितला!दर घसरणीमागील प्रमुख कारणे
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे पुढील अध्यक्ष केविन वॉर्श यांची नियुक्ती करण्याचा मानस व्यक्त केल्याच्या वृत्तानंतर बाजारात तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘हॉक’ भूमिका असलेल्या वॉर्श यांच्या नावामुळे व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील, अशी अपेक्षा निर्माण झाली. परिणामी डॉलर मजबूत झाला आणि सोन्यावरील दबाव वाढला.
मोठ्या प्रमाणावर नफा वसुली
जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास ३२ टक्क्यांची वाढ झाल्यानंतर मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात विक्री केली. दरम्यान, या तीव्र घसरणीनंतरही दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोन्याबाबत तज्ज्ञांचा आशावाद कायम आहे. जागतिक भू-राजकीय अस्थिरता आणि मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी यामुळे भविष्यात सोन्याला आधार मिळेल, असे विश्लेषकांचे मत आहे.