नवी दिल्ली : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सामन्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. यंदाचा टी 20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. तर, फायनल 8 मार्चला होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 8 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी 6 वेळा भारतानं विजय मिळवला आहे. तर, एका मॅचमध्ये पाकिस्ताननं विजय मिळवला. एक मॅच टाय झाली होती. त्यात देखील भारतानं बॉल ऑऊटमध्ये विजय मिळवला होता.
टी 20 वर्ल्ड कप 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा आमने सामने आले होते. दरबनमध्ये झालेली मॅच टाय झाली होती. बॉल आऊटमध्ये भारतानं त्या सामन्यात विजय मिळवला. याच वर्ल्ड कमपध्ये भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमने सामने आले. भारतानं पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करत पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला.
2012 मध्ये झालेल्या कोलंबो येथील वर्ल्ड कपमधील सामन्यात भारतानं पाकिस्तानला 8 विकेटनं पराभूत केलं. 2014 मध्ये ढाका आणि 2016 मध्ये कोलकाता येथे भारतानं पाकिस्तानवर सहज विजय मिळवला होता.
2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दुबईत पाकिस्ताननं भारताला 10 विकेटनं पराभूत केलं होतं. हा पाकिस्ताननं टी 20 वर्ल्ड कमपध्ये भारतावर मिळवलेला एकमेव विजय आहे. यानंतर पुन्हा पाकिस्तानला विजय मिळाला नाही.
भारतानं 2022 मध्ये मेलबर्नमध्ये रोमांचक सामन्यात पाकिस्तानला 4 विकेटनं पराभूत केलं. 2024 मध्ये न्यूयॉर्कमध्ये भारतानं पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला.
आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने आले आहेत. आकडेवारी भारताच्या बाजूनं असली तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचमध्ये काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारत आणि पाकिस्तान 15 फेब्रुवारीला आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोत होणार आहे. दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचल्यास तो देखील श्रीलंकेतील कोलंबोत पार पडेल.