फलटण - वाढदिवसानिमित्त सायकल वाटप
esakal February 02, 2026 02:45 AM

फलटणला गरजू विद्यार्थ्यांना सायकल

श्रीराम विद्याभवनमध्ये प्रवीण आवटेंचा उपक्रम

आसू, ता. १ : महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फलटण येथील सनदी लेखापाल प्रवीण आवटे यांनी सायकलींचे वाटप केले.

संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम आवटे, संस्थेचे सचिव रवींद्र बेडकीहाळ, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रवींद्र बर्गे, नियामक मंडळाचे सदस्य गजानन पारखे, फलटण जायंट्स ग्रुपचे फेडरेशनचे शिरीष शहा, संचालक प्रभाकर भोसले, अध्यक्ष शामराव निकम, सुप्रिया आवटे, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना तीन सायकलींचे वाटप केले. मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी स्वागत केले. दीपाली निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले.

02445
फलटण : विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करताना प्रवीण आवटे, सुप्रिया आवटे, रवींद्र बेडकीहाळ, रवींद्र बर्गे, प्रभाकर भोसले, मनीष निंबाळकर आदी. (अशोक सस्ते : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------------

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.