Pune News : सत्यजित बडे यांची पुणे येथे दिव्यांग आयुक्तपदी नियुक्ती
esakal February 03, 2026 03:45 AM

मंचर : रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे (आय ए एस)यांची पुणे येथील दिव्यांग व्यक्तींसाठी आयुक्त या महत्त्वाच्या पदावर सोमवारी(ता २)नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि विकासाभिमुख कार्यपद्धती लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी बडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही प्रभावीपणे काम पाहिले आहे. प्रशासकीय नियोजन, लोकाभिमुख निर्णय आणि तळागाळातील घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यात त्यांचा हातखंडा राहिला आहे.

पालिकेत कामांचा खोळंबा

सन 2006 मध्ये आंबेगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी विशेष ठसा उमटविला होता. या कालावधीत त्यांनी:जिल्हा परिषद शाळांचे व्यापक नूतनीकरण, महिला बचत गटांची स्थापना व संघटन, ग्रामीण महिलांसाठी उद्योग व व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, यांसारखी कामे प्राधान्याने राबविली होती. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, तर ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतही सकारात्मक बदल दिसून आले.

पुणे येथे दिव्यांग आयुक्त म्हणून काम करताना दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण, पुनर्वसन योजना, कौशल्य विकास आणि समावेशक प्रशासन आदिकामे प्रभावीपणे केली जाणार असल्याचे बडे यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.