आम्ही टॉक्सिक नव्हतो पण... प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितलं ब्रेकअपचं कारण; म्हणाली, 'तो वयाने मोठा असल्याने...'
esakal February 03, 2026 03:45 AM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. आपल्या सौंदर्यानेही तिने चाहत्यांना भुरळ घातली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोबतच प्रियदर्शिनी अनेक चित्रपटांमध्येही दिसली. आता पुन्हा एकदा अभिनेत्री नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लग्नाचा शॉट' या चित्रपटात ती दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलंय. मुलाखतीत तिने तिच्या ब्रेकअपचं कारण सांगितलंय.

प्रियदर्शिनी आणि अभिजित आमकर यांनी नुकतीच प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये हजेरी लावलेली. यात बोलताना प्रणितने प्रियदर्शिनीला विचारलं, 'तू सिंगल आहेस का?' यावर तिने 'हो' असं उत्तर दिलं.' त्यानंतर प्रणितने तिला तिच्या ब्रेकअपबद्दल विचारलं. त्यावर प्रियदर्शिनी म्हणाली, 'माझा २०२५ मध्ये ब्रेकअप झालाय.' पुढे ब्रेकअपचं कारण सांगताना प्रियदर्शिनी म्हणाली की, 'जुळलं नाही. आमच्यात कॉम्पॅटिबिलिटी नव्हती.' पुढे प्रणितने तिला रिलेशनशिप टॉक्सिक होतं का? असं विचारलं.

View this post on Instagram

A post shared by कलाकृती मीडिया (@kalakrutimedia)