Sun Blasts : सूर्यावर हे काय सुरुय? 24 तासांपेक्षा कमी वेळात 17 मोठे स्फोट; बॅड मूडमागचं कारण आलं समोर, आपल्यावर कसा परिणाम होणार, पाहा
esakal February 03, 2026 03:45 AM

सूर्यावर सध्या प्रचंड हालचाल सुरू असून अवघ्या २४ तासांत तब्बल १७ स्फोट झाल्याने शास्त्रज्ञ आणि उपग्रह यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ‘AR 4366’ नावाच्या एका प्रचंड सूर्यडागामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी अगदी छोटा दिसणारा हा Sun spot आता झपाट्याने वाढून अतिशय धोकादायक बनला आहे.

हा सूर्यडाग इतका मोठा आहे की तो १८५९ मध्ये घडलेल्या ऐतिहासिक कॅरिंग्टन इव्हेंटमधील सन स्पॉटच्या जवळपास निम्म्या आकाराचा मानला जात आहे. कॅरिंग्टन इव्हेंट हा आजवरचा सर्वात शक्तिशाली सौर वादळ होता. त्यामुळे सध्याची परिस्थिती शास्त्रज्ञांसाठी चिंतेची आहे.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी या सूर्यडागातून ‘X8 ’ दर्जाचा अतिशय भयानक मोठा सौर ज्वालास्फोट झाला. या स्फोटामुळे पृथ्वीच्या वरच्या वातावरणावर परिणाम झाला आणि दक्षिण पॅसिफिक भागात, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडसह रेडिओ संपर्क काही काळासाठी खंडित झाला. विमान आणि समुद्री दळणवळणातही अडथळे आले.

Instagram News : इंस्टाग्राम गुपचुप ऐकतंय तुमचं बोलणं? बंद करा 'ही' 1 सेटिंग नाहीतर होईल नुकसान..कंपनीच्या हेडनी स्पष्टच सांगितलं

या एका स्फोटानंतरही सूर्य शांत झाला नाही. त्याच भागातून ‘x 2.9’ सह आणखी अनेक शक्तिशाली स्फोट झाले. अमेरिकेच्या अवकाश हवामान संस्थेने हे स्फोट तीव्र प्रकारात वर्गीकृत केले आहेत. फक्त २४ तासांत २० पेक्षा जास्त सौर ज्वालास्फोट नोंदवले गेले.

शास्त्रज्ञांच्या मते, या सनस्पॉटमधील चुंबकीय क्षेत्रे अतिशय गुंतागुंतीची आहेत. ती ताणलेल्या रबरपट्ट्यासारखी अचानक तुटून प्रचंड ऊर्जा बाहेर फेकतात आणि स्फोट होतात. सध्या पृथ्वीच्या दिशेने मोठे सौर वादळ येण्याचे स्पष्ट संकेत नाहीत.. मात्र तशी शक्यता तपासली जात आहे.

Gold Research : कचऱ्यात लपलेलं 'सोनं'! शास्त्रज्ञांनी सिगरेटच्या बटपासून बनवली 'हाय-टेक' बॅटरी; झटपट चार्ज करेल तुमचे गॅजेट्स

जर पृथ्वीच्या दिशेने सौर वायू ढग आले तर पुढील काही दिवसांत ध्रुवीय भागात सुंदर तेजोवलय दिसू शकतात. मात्र याचबरोबर वीजपुरवठा, उपग्रह सेवा आणि दळणवळण यावर परिणाम होण्याचा धोका आहे.

२०२६ मधील आतापर्यंतची ही सर्वात तीव्र सौर हालचाल मानली जात आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी आवाहन केले आहे की नागरिकांना घाबरू नये, पण अधिकृत इशारे आणि माहितीवर लक्ष ठेवावे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.