पुणे: पुण्याच्या महापौरपदासाठी आज अर्ज भरले जाणार आहेत. ११९ नगरसेवक (Pune Mayor Election) निवडून आल्याने भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे. मात्र महापौर बिनविरोध निवडला जावा यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा करण्यात आली आहे. पुणे महापालिकेत दोन नंबरचा मोठा पक्ष घड्याळ हे चिन्ह असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या पक्षाचे २७ नगरसेवक (Pune Mayor Election) निवडून आलेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ नगरसेवक (Pune Mayor Election) निवडून आलेत. या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते १२ वाजता पुणे महापालिकेत भेटणार असुन महापौर पदासाठी भाजपच्या विरोधात उमेदवार उभा करायचा की नाही याबाबत निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांना तुरुंगातून बोलवलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Pune Mayor Election)
राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांना पहिल्या पालिकेच्या सर्वसाधारण मुख्य सभेला बोलवलं जाणार आहे. नगरसचिवांकडून कारागृहाला पत्र पाठवले जाणार आहे. तर नऊ तारखेला होणार पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर सर्वसाधारण सभेला हजर राहण्यासाठी पत्राचा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील दोघींना उपस्थित राहण्यासाठी पत्र देणार आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेत मतदानासाठी आंदेकर सासू-सून उपस्थित राहणार आहेत. लक्ष्मी आंदेकर,सोनाली आंदेकर या दोघी कोल्हापूर कारागृहात आयुष कोमकर त्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत.(Pune Mayor Election)
दरम्यान, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघीही सध्या आयुष कोमकर खून प्रकरणात कोल्हापूर कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधीही महत्त्वाच्या मतदान प्रक्रियेसाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बाहेर आणण्यात आले होते. आता पुन्हा एकदा महापौर-उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आंदेकर सासू सुनांना सभेसाठी बोलावले जाण्याची शक्यता असल्याने पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ९ तारखेला होणाऱ्या सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, या मतदानातून नेमकी सत्ता कुणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापालिकेकडून कारागृहाला यासाठी आवश्यक असलेला पत्राचा ड्राफ्ट आधीच तयार करण्यात आला असून, लवकरच तो कारागृह प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे. पुणे महानगरपालिकेची ही पहिली सर्वसाधारण मुख्य सभा असल्याने, या सभेत होणाऱ्या मतदानाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांची उपस्थिती निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.(Pune Mayor Election)
आणखी वाचा