नाशिकच्या महापौर, उपमहापौर पदाचा आज फैसला होणार आहे. नाशिक महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
मंत्री गिरीश महाजन आज नाशिकमध्ये सर्व नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांची घेणार बैठक आहेत. या बैठकीत महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावाची देखील घोषणा होणार. भाजपकडून हिमगौरी आडके आणि दिपाली गीते यांची नावं आघाडीवर तर ऐनवेळी अनपेक्षित नाव देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.
-नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपाची एकहाती सत्ता, भाजपचं संख्याबळ ७२
Nagpur Live: भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात अजितदादांना वाहण्यात आली श्रद्धांजलीनागपूर - भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अजित पवार यांच्या निधनामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे. अशात नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चनोडा गावात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात स्वर्गीय अजित पवार यांना गावकऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
Chandrapur Live: चंद्रपूर महानगर पालिकेचा अंतर्गत वाद चांगलाच वाढलाचंद्रपूर महानगर पालिकेचा अंतर्गत वाद चांगलाच वाढला असताना आज कॉंग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर यांच स्टेटस बोलकं आणि लक्ष वेधून घेणार आहे...
- जंग मे जाने वाले घोडे बारातो मे नही नाचा करते म्हणत डिवचले...
- महानगर पालिकेच्या वादावर आज दिल्लीत तोडगा निघणार की ही जंग आणखी वाढणार याकडे लक्ष....
Buldhana News : मेहकरमध्ये हॉस्पिटलबाहेर विद्युत डीपीला आग,बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पाखरे हॉस्पिटलजवळ असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत डीपीला अचानक आग लागली. डीपीजवळ वाहने उभी होती आणि शेजारीच हॉस्पिटल असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Sharad Pawar : शरद पवार आज पुणे मुक्कामी, दिल्ली दौरा रद्दशरद पवार आज पुण्यात मुक्कामी आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला. आज ते पुण्यात मुक्कामी येणार असून उद्या बारामतीत दाखल होणार आहेत. पुढील २, ३ दिवस इथेच थांबणार असल्याची माहिती समजते.
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा तपास CID करणारराज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास आता सी आय डी म्हणेजच गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. उच्चपदस्थ व्यक्तींच्या अकस्मात मृत्यू किंवा अपघात प्रकरणात सी आय डी कडे तपास जाण्याची तयारी प्रशासन आणि न्यायव्यवस्थेमध्ये असते त्यामुळे या घटनेचा आता पुढील तपास सी आय डी करणार आहे.
Dharashiv News : झेडपी प्रचारासाठी मंत्री बावनकुळेंची सभाधाराशिवमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सभा धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे सभा घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक या सभेसाठी उपस्थित होते.भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्याचा आवाहन यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल आहे.
Weather Update : पुढील २४ तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणसह मुंबई शहर-उपनगरांत तापमानात वाढ जाणवण्याची शक्यतामहाराष्ट्राच्या बहुतांश भागांत हिवाळा हळूहळू निरोप घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून, तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील २४ तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानवाढ जाणवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
D. K. Shivakumar : 'सत्तावाटप'च्या आरोपांवर विधानसभेत जोरदार खडाजंगी; डी. के. शिवकुमारांचा ठाम खुलासाबंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे १३९ आमदार हेच माझे बलस्थान आहे. सिद्धरामय्या शंभर टक्के माझ्यासोबत आहेत, असे सांगून उपमुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला.
Kolhapur News : पाचव्या दिवशीही भाविकांच्या पदरी निराशा; अत्यल्प तीव्रतेमुळे किरणे गरुड मंडपातच लुप्तकोल्हापूर : यंदाच्या उत्तरायण किरणोत्सवात सलग पाचव्या दिवशीही ढगाळ हवामानाने भाविकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. सूर्यकिरणे करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत. अत्यल्प तीव्रतेमुळे किरणे गरुड मंडपातच लुप्त झाली आणि हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची निराशा झाली. अंबाबाई मंदिरात दरवर्षी दक्षिणायन व उत्तरायण अशा दोन पर्वांत किरणोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या उत्तरायण किरणोत्सवाला गुरुवारी (ता. २९) सुरुवात झाली. मात्र, गेल्या पाच दिवसांत एकदाही किरणे पूर्ण स्वरूपात देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करू शकली नाहीत.
Katraj Milk Union : कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठरावपुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाला "अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज" असे नामकरण करण्याचा ठराव नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.
Kolhapur News : दानोळीमध्ये वारणा नदीत मगरीचा वावर, तत्काळ बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणीदानोळी : येथील वारणा नदीच्या काठावर तांबोळी वतातील परिसरात मोठी मगर रोज गवताच्या कुरणात येऊन पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी शेतकरी, मजूर व मेंढपाळांची नियमित वर्दळ असते. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Donald Trump : भारतावरील आयातशुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के करणार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणाLatest Marathi Live Updates 03 February 2026 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मोदी यांनी रशियाकडून तेलखरेदी बंद करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. तसेच अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार करण्यावर आम्ही शिक्कामोर्तब केले असून, त्यानुसार भारतावरील आयातशुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच जळगाव येथील सुवर्ण बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोने, चांदीच्या भावात घट होत आहे. चांदीत आज तब्बल ५३ हजारांची घट झाली, तर सोन्यात नऊ हजार ८०० रुपयांची घट झाली. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील चिनी घुसखोरीशी संबंधित कथित माहितीच्या आधारे केलेल्या दाव्यांमुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ होऊन कामकाज दिवसभरासाठी विस्कळीत झाले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींच्या दाव्यावर जोरदार आक्षेप नोंदविला. याशिवाय देश आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन तसेच मान्सूनविषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी एका क्लिकवर सविस्तर माहिती मिळवा...