अमेरिकेकडून टॅरिफ कमी होताच भारतीय शेअर बाजारात उसळी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारला, निफ्ट
Marathi February 03, 2026 03:26 PM

आज शेअर बाजार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर, (Union Budget 2026) आणि अमेरिकेकडून आयात शुल्कात कपात (US President Donald Trump Tariff) केल्यानंतर भारतीय भांडवली बाजारात (Stock Market Today)आठवड्याचा दुसरा दिवस काहीसा सकारात्मक दिसून आला आहे. अमेरिकेकडून आयातशुल्क (Tariff) कमी करताच डाॅलरच्या तुलनेत रुपया मजबूत स्थितीत असल्याचे दिसतंय. भारतीय भांडवली बाजारात डाॅलरच्या तुलनेत रुपया 90.40 वर उघडलाय. काल, म्हणजेच सोमवारी रुपया 91.51 प्रति डाॅलरवर बंद झाला होता. त्यांनतर डाॅलरच्या तुलनेत रुपया 1.11 पैशांनी मजबूत होत मोठी उसळी घेतांना दिसतोय. तर दुसरीकडे सेन्सेक्सची 3 हजार 600 हून अधिक अंकांनी सुरुवात झाली आहे.

दरम्यान, निफ्टी देखील 1 हजार 200 अंकांनी वधारला आहे. अमेरिकेकडून आयात शुल्कात कपात केल्यानंतर भांडवली बाजार तेजीत आल्याचे दिसून आले आहे.

Share Market Today : बाजारपूर्व सुरुवातीमध्येही जोरदार वाढ

भारतीय शेअर बाजाराने मंगळवार, (३ फेब्रुवारी रोजी) आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली. बाजारपूर्व सुरुवातीमध्येही जोरदार वाढ दिसून आली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50, हिरव्या रंगात उघडले. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 3,656.74 अंकांनी म्हणजेच 4.48 टक्क्यांनी वाढून 85,323.20 वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी 501,219.65 अंकांनी म्हणजेच 4.86 टक्क्यांनी वाढून 26,308.05 वर पोहोचला. सकाळी 9.25 वाजेपर्यंत, सेन्सेक्स 2,407 अंकांनी वाढून 84,073 वर व्यवहार करत होता. निफ्टी 50, 760 अंकांनी वाढून 25,848 वर पोहोचला.

PM Modi On Tariff : अमेरिका-भारत व्यापार करारानंतर टॅरिफ 25 वरुन 18 टक्क्यांवर

अनेक महिन्यांच्या अनिश्चिततेनंतर आणि वाढत्या व्यापार दबावानंतर, सोमवारी रात्री दीर्घकाळ प्रलंबित असलेला अमेरिका-भारत व्यापार करार अखेर अंतिम झालाहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणानंतर थेट कराराची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi On Tariff) यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा केली. या करारानुसार, अमेरिका भारतावरील कर 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार असल्याचे जाहीर केलंय.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

ही बातमी वाचा:

PM Modi On Tariff : भारतावरील टॅरिफ 25 वरुन 18 टक्क्यांवर; अमेरिका-भारत व्यापार करारानंतर पंतप्रधान मोदींनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार, म्हणाले…

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.