पुणे : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपकडून मंगळवारी मंजूषा नागपुरे यांनी महापौर पदासाठी, तर रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांनी उपमहापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केला. भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नागपुरे व वाडेकर यांनी आपला अर्ज दाखल केला. महापालिका निवडणूक बिनविरोध लढून आल्यानंतर आता नागपुरे यांना महापौरपदाची संधी प्राप्त झाली आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक ११९ जागांवर लढून एकहाती विजय प्राप्त करत सलग दुसऱ्यांदा महापालिकेवर सत्ता मिळविली. त्यामुळे पुणे महापालिकेच्या महापौरपदाचा भाजपचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र महापौर नेमके कोण होणार ? याबाबत पुणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. दरम्यान, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महापालिकेत दोन-तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केलेल्या महिला नगरसेवकांमध्ये महापौर पदासाठी जोरदार चुरस निर्माण झाली होती.
दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीच्या सोमवारी रात्री झालेल्या मिटींगमध्ये वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे व मानसी देशपांडे हि तीन नावे निश्चित करण्यात आली. त्यानंतर, मंगळवारी सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी भाजपला अनेक वर्ष भाजपला साथ देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर देण्याच्या सूचना फडणवीस यांनी नेत्यांना दिल्या. त्यामध्ये परशुराम वाडेकर यांना संधी देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार वाडेकर यांची निवड करण्यात आली. त्यानुसार, दुपारी साडे बारा वाजता महापालिकेत गटनेते गणेश बिडकर यांच्या दालनात भाजपची बैठक झाली.
Kolhapur election : हलगी-घुमक्याच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल; कोल्हापूरच्या निवडणूक कार्यालयांत उत्सवाचे वातावरणया बैठकीत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मंजूषा नागपुरे यांची महापौरपदासाठी, तर परशुराम वाडेकर यांची उपमहापौर पदासाठी अधिकृत घोषणा केली. त्यानंतर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, गटनेते गणेश बिडकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, श्रीनाथ भिमाले यांच्यासमवेत नागपुरे यांनी महापौरपदासाठीचा अर्ज महापालिकेच्या नगर सचिव योगिता भोसले यांच्याकडे सादर केला. त्याचवेळी वाडेकर यांचाही उपमहापौरपदासाठीचा अर्ज भोसले यांच्याकडे सादर करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शहराध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, महीपाल वाघमारे, नीलेश आल्हाट आदी उपस्थित होते. येत्या सोमवारी (ता.९) महापौर व उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
घोषणांनी दुमदुमले नगर सचिवांचे कार्यालयमहापौर व उपमहापौरांचे अर्ज भरण्यासाठी भाजप, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासूनच महापालिकेत गर्दी केली होती. भाजपच्या बैठकीमध्ये नागपुरे व वाडेकर यांची नावे घाटे यांनी अधिकृत जाहीर केले. त्यानंतर दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी नगरसचिव योगिता भोसले यांच्या कार्यालयात दाखल झाले. अर्ज दाखल करताना जय श्रीराम, भाजप, आरपीआय व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा कार्यकर्त्यांनी जयघोष केला.