नेरूळ, ता. ३ (बातमीदार) : गट नोंदणी प्रक्रियेसाठी सोमवारी (ता. २) कोकण भवन येथे आलेल्या मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची आमदार मंदा म्हात्रे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान म्हात्रे यांनी नगरसेवकांचे अभिनंदन करीत पुढील काळात मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करा, मुंबईतील सर्वसामान्य जनतेची कामे करा, असा सल्ला दिला. या वेळी गट नोंदणी प्रक्रियेसंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. या वेळी म्हात्रे यांच्यासोबत नवी मुंबईतील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.