मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा, SIT चौकशी करा, अमोल खुणे  यांची मागणी, मी सुटू नये म्हणून वकील मॅनेज केले 
रवी मुंडे, एबीपी माझा February 04, 2026 02:43 AM

जालना : मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्टसह एसआयटी चौकशी करावी असी मागणी, जरांगेंच्या घातपाताचा आरोप असलेल्या अमोल खुणे यांनी केली आहे. ते मनोज जरांगे यांचे जुने सहकारी देखील होते. या मागणीचे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले असून अमोल खुणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. माझा आणि धनंजय मुंडे यांचा कोणतीही सबंध  नसून, दादा गरुडच्या सोबतच्या संभाषणात सुपारीचा कोणताही उल्लेख नाही, उलट दादा गरुडकडे मनोज जरांगे यांचे पुरावे असल्याचं त्यांनी म्हंटलंय. 

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाण करण्यासाठी आपल्याला मनोज जरांगे यांनीच  सांगितलं होतं, यात जरांगे मात्र स्वतः पळून गेले होते असेही खुणे यांनी म्हटलंय. जरांगेचा कोणी आका असेल म्हणून ते धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करत असतील. मनोज जरांगे आणि मी 2016 मध्ये  धनंजय मुंडे यांच्याकडे कार्यक्रमासाठी पैशाची मागणी केल्याचां खुलासा देखील अमोल खुणे यांनी केला आहे. मी कोर्टातून सुटू नये म्हणून मनोज जरांगे यांनी वकील मॅनेज केल्याचा देखील आरोप खुणे यांनी केला आहे. दरम्यान याची चौकशी होईपर्यंत आपण  थांबणार नसून मी हा डाग लागून मरणार नाही नाहीतर आत्महत्या करेल असा इशारा देखील अमोल खुणे यांनी दिला आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.